मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
बालाजीनगर (लमाणतांडा) जल जीवन मिशन योजना अंतर्गत विहीर, गावा बरोबर सर्व वाड्या -वस्त्या पर्यंत पाईपलाईन, पाण्याची टाकी लवकरात लवकर पूर्ण व्हावी. काम लवकरात लवकर सुरू व्हावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपसरपंच अश्विनी श्रीकांत पवार यांनी दिला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर लमाणतांडा येथे अल्पसंख्यांक लोकवस्ती असलेला साधारण 3500 लोक वस्ती चा तांडा अनेक वर्षापासून पाण्याची गंभीर अडचणी समस्या आहेत.
यातून मार्ग निघावा माय माऊलीच्या डोक्यावर हंडा आणि सायकलीवरच्या घागरी उतराव्यात म्हणून राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मागील दोन वर्षापासून आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्राची पूर्तता करून योजना मंजूर झाली.
दिनाक 27/2/2023 रोजी काम सुरू करण्यासंदर्भात ठेकेदार पांडुरंग मच्छिंद्र लेंडवे यास अंतिम मंजुरी आदेश दिले.
सर्व टेस्टिंग रिपोर्टच्या बाबी पूर्ण असून सर्व आदेश मंजुरी असून सुद्धा वेळोवेळी सांगूनही विहीर खोदायचे काम सुरू झाले नाही.
भविष्याच्या दृष्टिकोनातून पाण्याची कोणती अडचण येऊ नये म्हणून विहिरीचा पॉईंट पाझर नझिक घेतला आहे. जर वेळेत काम सुरू नाही झालं ,पाऊस सुरू झाला , भविष्यात कॅनॉल ने तळ्यात पाणी सोडलं गेलं तर त्या ठिकाणी विहीर काढता येणार नाही.
या मुळे लोकांना पाण्यापासून वंचित राहावे लागेल. मजुरी करून खाणाऱ्या या समाजाला पाहण्यासाठी रानोमाळ फिरावं लागेल. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे त्वरित विहिरीचे काम सुरू व्हावे अशी गावकऱ्यातून प्रशासनाला विनवणी करण्यात येत आहे.
सध्या गावात गंभीर पाण्याची समस्या आहे. माता -भगिनींना मोल मजुरी जाण्याऐवजी व मुलांना खेळणे अभ्यास करणे ऐवजी आज तास न तास पाण्यासाठी फिरावं लागत आहे. बालाजीनगर (लमाणतांडा) जल जीवन मिशन योजना अंतर्गत विहीर, गावा बरोबर सर्व वाड्या -वस्त्या पर्यंत पाईपलाईन, पाण्याची टाकी लवकरात लवकर पूर्ण व्हावी. काम लवकरात लवकर सुरू व्हावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल- अश्विनी श्रीकांत पवार, उपसरपंच ग्रामपंचायत (लमाणतांडा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज