मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वावरून दोन दिवस सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
नवीन नेतृत्वाच्या निवडीसाठी पवारांनी नेमलेल्या समितीची आज शुक्रवारी सकाळी मुंबईत बैठक होत आहे. तीत ‘शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन तहहयात पक्षाध्यक्ष राहावे,’ असा एक ओळीचा ठराव ठेवला जाण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांचा आग्रह व समितीच्या ठरावाचा मान राखून पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेतील, अशी शक्यता आहे. ‘कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्षित केली जाणार नाही,’ असे सांगून त्यांनी तसे संकेतही दिले.
तसेच पक्षात कार्याध्यक्षपद निर्माण करून ते सुप्रिया सुळेंकडे सोपवले जाऊ शकते. मात्र या निर्णयामुळे पक्षावर ताबा मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असलेले अजित पवार व त्यांचे समर्थक आमदार नाराज होण्याची शक्यता आहे.
कार्याध्यक्षपद सुप्रियांकडे सोपवण्याची शक्यता
सुप्रियाच का ?
निवडणुका होईपर्यंत पवार अध्यक्ष राहतील. ते सुप्रियांची राष्ट्रीय नेतृत्वाची प्रतिमा तयार करून देतील. उत्कृष्ट संसदपटू सुप्रियांचा दिल्लीत सर्वपक्षीय मुंबईत उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांना समजावताना सुप्रिया सुळे. नेत्यांशी संपर्क आहे.
समितीत खडसेंची अचानक एंट्री
नेतृत्व निवडण्यासाठी २० जणांची समिती पवारांनी ठरवली आहे. त्यात अजितदादा व धनंजय मुंडे सोडले तर सर्व जण पवारांचाच शब्द प्रमाण मानणारे आहेत. एकनाथ खडसे यांचा समितीत समावेश नव्हता. मात्र गुरुवारी अचानक त्यांचे नाव पवारांनी समाविष्ट केले.
नाराज ठाकरेंचे पवारांनाही टोमणे
‘लोक माझे सांगाती’ मध्ये पवारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे ठाकरे नाराज झाले आहेत. म्हणूनच पवारांच्या निवृत्तीवर ते म्हणाले, ‘मी पवारांना कसा सल्ला देणार ? अन् माझा सल्ला त्यांना पचनी नाही पडला तर काय करू ?
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज