टीम मंगळवेढा टाईम्स । वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी लावून अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर मंगळवेढा पोलियांनी गुन्हा नोंदला आहे. याप्रकरणी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी फिर्याद दिली आहे.
मंगळवेढ्यात अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. पेट्रोलिंगसाठी चालक अजित मुलाणी व विजय रजपूत असे तिघे सरकारी वाहनाने कारवाईसाठी निघाले होते. हे दोघेजण दामाजी कारखाना चौकात आले आणि उचेठाणकडून येणाऱ्या टमटमवर कारवाई करून ते वाहन ताब्यात घेतले.
इतक्यात विना क्रमांकाच्या दोन दुचाकीवर आले. त्यांनी आपल्या गाड्या आडव्या लावून अडथळा निर्माण केला. याप्रकरणी त्यांनी विजय नाईकवाडी व कपिल परचंडे या दोघांवर गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Two-wheeler lying horizontally in front of Tehsildar’s vehicle; Crime on both
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज