मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
लग्नात मानपान व हुंडा न दिल्याच्या कारणावरुन 43 वर्षीय विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी सासू मल्लमा भिमाशंकर जंगलगी, नवरा रमेश भिमाशंकर जंगलगी (रा.सैफुल सोलापूर) व नणंद रुपाली (रा.पडणूर जि.विजापूर) या तिघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी नंदूर ता. मंगळवेढा येथील असून यांचा विवाह दि.2 जानेवारी 2013 मध्ये नात्यातील रमेश भिमाशंकर जंगलगी(रा.सैफुल,सोलापूर) यांच्याशी हिंदू धर्मातील रितीरीवाजाप्रमाणे झाला होता.
तद्नंतर सन 2022 पर्यंत फिर्यादी ही सासरी नांदावयास होती. फिर्यादीचा पती रमेश हा क्लुजर भाड्याने चालवून कुटूंबाची उपजिवीका भागवत असे.
सन 2014 पर्यंत सासरकडील लोकांनी फिर्यादीचा व्यवस्थित सांभाळ केला. आरोपी सासू फिर्यादीस तुझा नवरा तुला येथे सोडून जातो, तुझा सांभाळ करणे आम्हांला परवडत नाही असे म्हणून शारिरीक व मानसिक त्रास देत असे.
तुझा नवरा कोठे आहे तु तिथे जा असे म्हणून घरातून हाकलून दिल्याने घराशेजारील लोकांनी सासूस समजावून सांगून फिर्यादीस घरात घेतले होते.
आरोपी नणंद ही माहेरला आल्यावर तु येथे राहायचे नाही, माझ्या आई-वडिलांचे घर आहे. तु लग्ना आधी वाईट वागत होती असे म्हणून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन शारिरीक, मानसिक त्रास दिला.
तर आरोपी पती याने तुझ्या माहेरकडील लोकांनी लग्नात हुंडा दिला नाही या कारणावरुन वाद घालून लाथाबुक्क्याने मारहाण करुन घरातून हाकलून दिले.
सदर फिर्यादीस नवर्यापासून एक मुलगी व एक मुलगा अशी अपत्ये आहेत. माहेरच्या लोकांनी येवून वरील आरोपींना चार लोकासमक्ष समजावून सांगितले.
मात्र नांदवण्यास नकार देवून फिर्यादीस माहेरी आणून सोडून दिले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज