टीम मंगळवेढा टाईम्स ।
एकतर्फी प्रेमातून मुलाने धमकी दिल्याने व इतर तीन अल्पवयीन मुलींनी चिडवल्याने नववीतील मुलीने आत्महत्या केल्याच्या कारणावरून एका युवकासह इतर तीन मुलींच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूपाली नामदेव बंकवाड (वय १६, रा. अनिल नगर, पंढरपूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली हिने २५ मार्च रोजी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी अँगलल ओढणीने गळफास घेतला होता.
पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर उघड झाले की, वैजीनाथ सुनील पवार (वय १९) याने एकतर्फी प्रेमातून रुपालीला धमकी दिली होती. तसेच तिच्या मैत्रिणीदेखील रूपालीस वैजीनाथच्या नावाने चिडवत होत्या.
तसेच वैजीनाथसोबत प्रेम करण्याचा आग्रह धरल्याने रूपालीने आत्महत्या केली. तपास अधिकारी प्रशांत भागवत यांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर उभा केले असता न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिली आहे.(स्रोत:लोकमत)
बनावट पॉलिसी तयार करून चोलामंडलम्ची ३ कोटींची फसवणूक
विमा कंपनीची बनावट कागदपत्र आणि पॉलिसी तयार करुन जवळपास ३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.
याबाबत डफरीन चौक येथील चोलामंडलम् एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेंजर विनय मंत्री यांनी दोघाजणांविरुध्द फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरटीओ ऑफीस जवळ सिध्दार्थ ऑनलाईन सर्व्हिसेसचे कार्यालय आहे. येथे अजय कोरवार आणि प्रदीप सावंत यांनी गेले वर्षभर चोलामंडलम् कंपनीची वेबसाईट वापरुन या कंपनीचे एजंट आहेत,
असे भासवून महाराष्ट्रासह सहा राज्यातील मोटार वाहनधारकांना कमी किमतीचा प्रिमीयम देतो, असे दाखवून या संबंधीच्या बनावट पॉलिसी तयार करुन कंपनीची जवळपास २ कोटी ९३ लाख ६८ हजार ८३६ रुपयाची फसवणूक केल्याची मंत्री यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा सपोनि बंडगर पुढील तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज