टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंगळवेढा शहरातील नगरपरिषद शाळांचा नव्याने कायापालट व नूतनीकरण करण्यासाठी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून २ कोटी ३० लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सदर योजनेअंतर्गत मंगळवेढा शहरातील नगरपालिका शाळा नं.१ येथे नवीन इमारत खोल्या बांधणे १ कोटी २५ लाख,
मंगळवेढा शहरातील सर्व नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक देणे व मंगळवेढा शहरातील सर्व नगरपालिका शाळांमध्ये आर. ओ. प्लांट बसवणे ३१ लाख,
मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत खंडोबा गल्ली येथील विद्यार्थी उत्कर्ष मंडळ येथे अद्यावत अभ्यासिका बांधणे व इतर सोयी – सुविधा उपलब्ध करून देणे ३० लाख, मंगळा शहरातील सर्व शाळांना भौतिक सोयी – सुविधा व सुशोभीकरण करणे ४४ लाख.
सदर निधीच्या अनुषंगाने बोलताना माजी सभापती आवताडे यानी सांगितले की, शालेय पातळीवर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आणि शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत राहण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना आवश्यक व योग्य त्या भौतिक सोयी – सुविधा मिळणे अतिशय गरजेचे आहे.
आधुनिक काळातील शिक्षणाची पद्धत मंगळवेढा शहरातील नगरपालिका विद्यार्थ्यांना सहजपणे आणि सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सदर निधीची मागणी केली होती.
मतदार संघातील विविध मूलभूत आणि पायाभूत बाबींच्या धोरणात्मक प्रगतीसाठी भरीव निधी आपल्या पदरात पाडून घेणाऱ्या आमदार आवताडे यांनी येणाऱ्या काळातील या देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सक्षमीकरण व भौतिक सुविधा उन्नतीसाठी हा निधी उपलब्ध करून मंगळवेढा शहरातील ज्ञानसाधनेची चाके अधिक गतीमान केली आहेत.
मंगळवेढा शहरातील नगरपालिका शाळांमध्ये अतिशय गुणवत्तापूरक अध्ययन आणि अध्यापन यांचे समीकरण परिपूर्ण होत असताना त्यांच्या या जोडीला भौतिक सोयी – सुविधा यांचे वलय पूर्ण सक्षमपणे निर्माण झाले पाहिजे यासाठी माजी सभापती सोमनाथ अवताडे यांनी विविध शालेय कार्यक्रमांमधून या शाळांचा देखणा कायापालट ठेवण्यासाठी अनेकदा मनोदय व्यक्त केला होता.
माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या या महत्वकांक्षी विकास धोरणाला अधिकतम रूपामध्ये व्यापकता उपलब्ध होण्यासाठी हा निधी अतिशय गरजेचा असल्याची चर्चा शिक्षणप्रेमी व पालकांमध्ये सुरू होती. सदर उपलब्ध झालेल्या या निधीतून वरील शाळांचे भौतिक रुपडे बदलण्यासाठी खूप मोठी मदत होणार असल्याचे चित्र मंगळा शहरातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये निर्माण झाली आहे.
आनंद आणि समाधान पालक वर्गांमध्ये दिसून येत आहे
गुणवत्तेचे आणि विद्यार्थ्यांच्या संस्कार जडणघडणीचे कृतिशील विद्या दालन म्हणून मंगळवेढा नगरपरिषद शाळांचा उभ्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा लौकिक आहे. या ज्ञानसंकुलामध्ये ज्ञानार्जन केलेले अनेक विद्यार्थी आज राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, व्यावसायिक व नामवंत खाजगी क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत.
गेली अनेक दशके निधीअभावी सदर शाळांचे प्रलंबित असणारे नूतनीकरण आमदार समाधान आवताडे व माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या या निधीमुळे मार्गी लागल्याचे मनस्वी आनंद आणि समाधान पालक वर्गांमध्ये दिसून येत आहे – दिगंबर यादव, सदस्य, न.पा.प्राथ. शिक्षण मंडळ मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज