टीम मंगळवेढा टाईम्स।
तुम्ही येथे कसल्या केसेस करता, तुम्हाला केसेस करण्याचा अधिकार कोणी दिला? तुम्ही येथून निघून जावा नाही तर मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग करुन
ते फेसबुकवर टाकून तुमची बदनामी करीन अशी जिल्हा वाहतूक पोलीसांना धमकी देवून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी महर्षी वाल्मिकी संघाचे शहराध्यक्ष अरविंद नाईकवाडी याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी ज्योतीराम गोविंद माळी हे जिल्हा वाहतूक शाखा सोलापूर येथे नेमणूकीस असून दि.25 रोजी पोलीस उपनिरीक्षक चनाप्पा म्हेत्रे,
पोलीस कॉ.सुनिल जतकर, सहाय्यक फौजदार सुभाष पवार असे मिळून मंगळवेढा शहराजवळील पंढरपूरला जाणार्या रोडवर अन्नपूर्णा हॉटेल जवळ सकाळी 10.15 वाजता वाहतूक नियामचे उल्लंघन करणार्यावर कारवाई करीत होतो.
दुपारी 1.15 वाजता एका महिंद्रा बोलेरा पिक वाहन क्रमांक एम.एच.42 – ए.क्यू-8646 हे रस्त्याने वेडेवाकडे चालवित येत असताना सदरचे वाहन हाताने इशारा करुन थांबविले.
चालकास खाली उतरुन वाहनाची कागदपत्रे व चालविण्याचा परवाना वाहन चालक आण्णासो निवृत्ती आगवणे (वय 43 रा.बारामती) हा दारुच्या नशेत आहे काय ? याबाबत खात्री करत असताना
पंढरपूरच्या दिशेने एक मोटर सायकलस्वार आमच्या जवळ येवून थांबला व म्हणाला तुम्ही येथे कसल्या केसेस करता, तुम्हाला केसेस करण्याचा अधिकार कोणी दिला?
तुम्ही येथून निघून जावा नाही तर मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग करुन फेसबुकवर टाकून तुमची बदनामी करेन अशी धमकी देवू लागला.
यावेळी उपस्थित पोलीसांनी तुम्ही कोण आहात? आम्ही तुम्हाला ओळखत नाही, आम्ही येथे कायदेशीर काम करीत आहोत, तुम्ही विनाकारण कामात अडथळा करु नका असे समजावून सांगत असताना मी वाल्मिकी संघाचा शहराध्यक्ष अरविंद नाईकवाडी आहे.
थोड्या अंतराव जावून तो मोबाईलव्दारे शुटींग काढू लागला. तेव्हां आम्ही त्यास येथून जावा असे समजावून सांगत असताना फिर्यादीचे शर्टाचे कॉलर धरुन तुमचे व्हिडीओ फेसबुकवर टाकून तुम्हां सर्वांना कामाला लावतो,
तुम्ही मला जातीवाचक बोलला असे म्हणून शासकीय कामकाज करताना सरकारी कामात अडथळा आणल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज