टीम मंगळवेढा टाईम्स।
ओळखीतून तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली. या संपूर्ण प्रकारातून तरुणी गर्भवती राहिल्यानंतर पिंपरी चिंचवड परिसरातील एका रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात केला.
त्यानंतर तिच्या सोबत लग्न करण्यास नकार देत दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न करत फसवणूक केली.
याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, सुजित दत्तात्रय मोरे (वय 25, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2019 ते जानेवारी 2023 याकालावधीत घडला आहे.
तक्रारदार तरुणीला सुजित याने लग्न करण्याचे आमिष दाखविले. तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून तरूणी गर्भवती राहिल्यानंतर तिने लग्नाबाबत विचारणा केली.
त्यावेळी त्याने घराचे कारण देऊन गर्भपात केला. त्यानंतर काही दिवसांनी त्याने दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. हा प्रकार समजल्यानंतर या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.(स्रोत:MPC न्युज)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज