टीम मंगळवेढा टाईम्स ।
निधी आणायला कमी पडणार नाही पण आलेला निधी खर्च करणार नसाल तर विचार करावा लागेल. जर कामच करायचे नसेल तर रजेवर जावा मी पर्यायी व्यवस्था करतो असा इशारा आमदार समाधान आवताडेंनी मुख्याधिकारी यांना दिला.
यावेळी प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर,मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,शशीकांत चव्हाण,दत्तात्रय जमदाडे,धनजंय खवतोडे,सोमनाथ आवताडे,आदित्य हिन्दुस्तानी,सुदर्शन यादव,ज्ञानेश्वर कौडूभैरी,सरोज काझी,दिगंबर यादव,कैलास कोळी,
पांडूरंग नाईकवाडी,दत्तात्रय भोसले, प्रा.येताळा भगत, सचिन शिंदे,रावसाहेब फटे,प्रकाश रोहिटे,नगरपालिकेच्या विविध विभागाचे प्रमुख व कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.आवताडे म्हणाले की,शहर विकासाठी निधी मोठ्या प्रमाणात येवून कामे आणि निधीचा विनियोग होत नसतील त्या निधी आणण्याचा उपयोग काय ?
मंजूर निधीतून कामच करणार नसाल दुसय्रा यंत्रणेच्या नावावर काम टाकून करून घेण्याचा इशारा देत 50 लाखाची संरक्षक भिंत व 50 लाखाची अभ्यासिकेच्या उपयोग काय ? 2.5 कोटी निधी देवून 7 महिन्यात अंदाजपत्रक करू शकत नाही
यावर आवताडे यांनी खंत व्यक्त करून कृष्ण तलाव सुशोभिकरणाचे 2.5 कोटीचा नगरपालिकेच्या ऐवजी अन्य विभागाला देण्याचा निर्णय घेतला.
शहराचे सौंदर्य वाढविण्याची जबाबदारी आपलीच असून हवा तेवढा निधी मिळवतो.शहरातील नळांना तोट्या बसविण्याच्या सुचना दिल्या.
प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर म्हणाले की,आ.समाधान आवताडे हे निधी मिळवतात,कर्मचाऱ्यांनी या मंजूर कामासाठी पळापळ करून खर्च करावा.
मंजूर कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी मुख्याधिकारी यांनी पाच लेखाशिर्ष मधून 10 कोटी निधी, विशिष्ट नागरी सुविधामधून 32 कामासाठी 2.57 लाख ,
वैशिष्टय़पूर्ण 18 कामासाठी 5 कोटी निधी मंजूर 4 कोटीची कामे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविण्यात आली.नाविन्यपुर्ण योजनेतून 2 कोटी ,नगरोत्थान मधून 83 लाख,
निधी मंजूर असल्याचे सांगितले यावेळी विशिष्ट ठेकेदाराला कामे देण्यासाठी अधिकारी प्रयत्न करतात असा आरोप सुरेश मेटकरी यांनी केला तर नारायण गोवे यांनी रस्त्याची कामे व्यवस्थित केली जात नाही.
तसेच जिल्हा स्तरावर मंजूर कामे खाली बैलगाडीच्या गतीने येतात.त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बोलावे अशी विनंती फिरोज मुलाणी यांनी केली.
जलतरणात विद्यार्थी चमकत आहेत तरी महादेव विहीर दुरूस्त होणे गरजेचे असल्याची मागणी ज्ञानेश्वर कौडूभैरी यांनी केली.बोराळे नाका येथे महर्षी वाल्मिकी स्मारक व्हावे अशी मागणी राजेंद्र कोळी यांनी केली.
नागेश डोंगरे यांनी शहरानजीक ग्रामपंचायती झाल्यामुळे शहर आकुंचन पावत आहे तरी दोन ग्रामपंचायती शहरात विलीनीकरण करावे अशी मागणी केली,शिवाजी सावंजी यांनी स्वच्छतेत लक्ष दिले जात नाही.
दिड महिन्यात एकही कर्मचारी शौचालयात फिरकला नाही तर ठेकेदारीवरील कर्मचाय्राच्या कामाबाबत सर्व काही आलबेल असल्याचा आरोप सुदर्शन यादव यांनी केला.
नारायण गोवे यांनी व्यापारी गाळ्यात शौचालयाचा अभाव असून असेल तर स्वच्छता केली जात नसल्याची तक्रार केली. गेल्या वर्षभरापासून नगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात असल्याने आ.आवताडेनी घेतलेल्या पहिल्याच आढावा बैठकीत तक्रारीचा पाऊस पडला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज