टीम मंगळवेढा टाईम्स।
करमाळा तालुक्यातील रावगाव येथून मक्का मदिना येथे हजयात्रा (उमराह) साठी गेलेल्या
महिला यात्रेकरूचा अकस्मात मृत्यू झाला. जैतूनबी नूरमहम्मद आतार (वय ६५, रा. रावगाव, ता.करमाळा) असे मृत्यू झालेल्या महिला यात्रेकरूचे नाव आहे.
शुक्रवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी आतार यांचा मृत्यू झाला. आठवडाभरापूर्वी रावगाव येथील रहिवासी जैतुनबी नूरमहम्मद आतार या मुलगा व सुनेसह मक्का मदिना येथील ‘उमराह यात्रे’ला गेल्या होत्या.
जैतुनबी यांनी शुक्रवारी जुम्माची व इशाची नमाज पठण केली होती. त्यानंतर त्यांना अचानक ताप आला, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
मदिना या पवित्र स्थळी भ्रमण करत असताना त्यांचे निधन झाले. गेल्या आठ दिवसांपासून त्या मुलगा शहानूर आतार व सूनबाई यांच्यासोबत यात्रेत सामील झाल्या होत्या.
जैतूनबी आतार यांच्यावर शनिवारी सकाळी मदिना येथे मोहम्मद पैगंबराच्या कबरी परिसरातील “जन्नतूल बकी कब्रस्तान” येथे दफनविधी करण्यात आला.
पिंपरी चिंचवड येथील शिक्षक बिलाल आतार व किराणा व्यावसायिक शहानूर आतार यांच्या त्या मातोश्री होत. जैतूनबी यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज