टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे शनिवारी दि.4 मार्च पासून दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, त्यांच्यासमोर विकासकामांचे सादरीकरण करण्यासाठी आढावा बैठका घेतल्या जात आहेत.
बुधवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वार्षिक योजनांचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रस्तावित कामांच्या १०० टक्के प्रशासकीय मान्यता झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांनी विहित वेळेत निधी खर्च करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.
सन २०२२-२३ च्या खर्चाचा यंत्रणानिहाय आढावा घेण्यात आला. तसेच, कार्यान्वयन यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर राबविण्यात येत असलेल्या योजनांची सद्यस्थिती व मार्च २०२३ अखेर निधी खर्च होण्यासाठी केलेली पूर्वतयारी यांची माहिती दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज