टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील हजरत पीर गैब वो मर्दाने गैब (रह.) उर्स शरिफ २०२३ म्हणजेच धार्मिक तसेच राष्ट्रीय एकात्मकेचे प्रतिक असलेल्या गैबीसाहेबांच्या ऊरूसास आज मंगळवार दि.२१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे.
यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती गैबीपीर ऊरूस कमिटीचे सरपंच प्रशांत गायकवाड यांनी दिली.
ऊरूसासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक सामील होतात. भाविक वर्ग नारळ-लिंबाचे तोरण गैबीसाहेबांच्या कळसास अर्पण करतात.
आज मंगळवारी दि.२१ फेब्रुवारीला सकाळी १० वा. प्रवेशव्दाराचे उदघाटन रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा यांचे हस्ते व व्हा. चेअरमन रामचंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सायंकाळी कळसाची भव्य मिरवणूक व देवाचा गंध होईल. बुधवारी २२ फेब्रुवारीला पहाटे ५ वा. सागर फायर वर्क्सचे आझाद दारूवाले यांच्या सौजन्याने शोभेचे दारूकाम होणार आहे.
सकाळी १० वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ जंगी कव्वाली, भंडारखाना होईल. २३ व २४ फेब्रुवारीला दुपारी ४ वा. जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन केले आहे.
दि. २३ रोजी सायंकाळी ७ वा. जंगी कव्वालीचा मुकाबला होईल. २५ तारखेला सकाळी ९ वा. मौलाना मेराज अहमद मिसबाही खतीब इमाम शाही जामा मस्जिद, मंगळवेढाच्यावतीने कुरआनखाणी होईल
तर रात्रौ ९ वा.रजाक मुजावर महेबूब मुजावर व समस्त मुजावर परिवाराच्यावतीने मौलूद शरीफ कार्यक्रम होईल.
सदरचा ऊरूस शांततामय वातावरणात पार पाडणेसाठी समस्त गैबीपीर ऊरूस कमिटीचे कार्यकारी मंडळ, सदस्य, मंगळवेढेकर प्रयत्नशील आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज