टीम मंगळवेढा टाईम्स ।
शासनाने दिलेल्या नियमाचे पालन न करता अव्वाच्या सव्वा बिल घेणारे तीन आधार केंद्रे सील करण्यात आले आहेत.
भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरणाने ही कारवाई केली असून, संबंधितांवर दीड लाखाचा दंड केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतूमध्ये नेमण्यात आलेले आधारकेंद्र, दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय परिसरातील आधारकेंद्र व नातेपुते येथील आधार केंद्रावर गेल्या आठवड्यात ही कारवाई झाली आहे.
आधारकेंद्रात जन्मलेल्या मुलापासून पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना आधारकार्ड तयार करण्यासाठी पैसे घेतले जात नाही. पाच वर्षांच्या बालकांनाही पैसे आकारले जात नाहीत.
पाच वर्षांनंतर नाव, पत्ता किंवा अन्य काही बदल असेल तर त्यासाठी ५० रुपयांचा शुल्क लावला जातो.
भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये तिन्ही ठिकाणी लोकांकडून जास्त पैसे घेतल्याचे
ऑपरेटरला एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकले आहे. नातेपुते येथील मोरोची जिल्हा परिषद शाळेत आधारकेंद्राला परवानगी देण्यात आली होती. मात्र हे आधारकेंद्र प्रत्यक्षात नातेपुते गावात चालवले जात होते. शिवाय नियमापेक्षा जास्त पैसे
अधिकाऱ्यांनी तत्काळ आधारकेंद्र सील केले व बँक गॅरेंटीसाठी भरण्यात आलेले ५० हजार रुपये जप्त केले. तीन केंद्राचे दीड लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. शिवाय तेथील घेतले जात होते.
सोलापूर जिल्ह्यात ५०० आधारकेंद्र
सोलापूर जिल्ह्यात एकूण सुमारे ५०० आधारकेंद्रे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १५७ आधारकेंद्र नियुक्त करण्यात आले आहेत.
अशाच पद्धतीने जिल्हा परिषद, पोस्ट ऑफिस, लिड बँक आदीमार्फतही आधारकेंद्र नियुक्त करण्यात आले आहेत. आधारकेंद्रावर भारतीय विशिष्ट ओळखत्र प्राधिकरणाचे नियंत्रण असते.
जास्तीचे पैसे मागितल्यास हेल्पलाइनवर संपर्क साधा
जनतेच्या सेवेसाठी बसवण्यात आलेल्या आधारकेंद्रावर जर आधारकार्ड तयार करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी होत असेल तर संबंधित नागरिकांनी तत्काळ १९४७ वर संपर्क साधावा. लेखी तक्रार help@uidai.inवर मेल करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.(स्रोत; लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज