mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

“कोण रोहित पवार?” प्रणिती शिंदेंच्या टीकेनंतर आता रोहित पवारांची वादावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..;

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 11, 2023
in राजकारण, राज्य, सोलापूर
“कोण रोहित पवार?” प्रणिती शिंदेंच्या टीकेनंतर आता रोहित पवारांची वादावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..;

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आ. रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, “कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल” अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांना उत्तर दिले.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या कन्या शरद पवारांचे नातू असलेल्या रोहित पवारांवर भडकल्या आणि त्याला कारण ठरलं.

रोहित पवारांनी सोलापूर लोकसभेच्या जागेबाबत केलेलं वक्तव्य… माझा अंदाज आहे की खासदारकी आणि तिथं असणारी सीट कुठल्या पार्टीला कधी द्यावं कसं द्यावं.

कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत; प्रणिती शिंदेंचा पवारांवर निशाणा pic.twitter.com/RGbQBPGR0n

— santosh gurav (@santosh29590931) February 10, 2023

याबाबतीतली बैठक कदाचित महिना दोन महिन्यात महाविकास आघाडीची होईल आणि त्याबाबतीत सर्वच घटक पक्षांना विश्वासात घेऊन सोलापूरची जी सीट आहे ती काँग्रेसकडे असावी की राष्ट्रवादीकडे असावी याबाबतीत निर्णय होईल.

प्रणिती शिंदेंच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आक्रमक झालाय. सोलापुरात राष्ट्रवादी युवक आणि युवती काँग्रेसनं रोहित पवारांच्या समर्थनार्थ पोस्टर लावले आहेत आणि तेही सोलापूर काँग्रेस कमिटीबाहेर.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जोरदार घोषणाबाजीही केलीय. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला गेल्यास त्याबदल्यात काँग्रेसला कुठली जागा मिळणार याची चर्चा सुरु झालीय.

लोकसभेला जेमतेम दीड वर्ष बाकी असल्यामुळं निवडणुकीची तयार सुरु झालीय पण त्याआधीच काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलीय.

सोलापूर लोकसभा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. 2019 साली काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे या जागेवरुन लढले.

त्यांच्याविरोधात भाजपनं ऐनवेळी जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरही या जागेवरुन लढले.

2019 च्या निवडणुकीत भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामींना 5 लाख 24 हजार 985 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंना 3 लाख 66 हजार 377 मतं मिळाली.

प्रकाश आंबेडकर यांनी 1 लाख 70 हजार 7 मतं मिळाली, 2019 च्या निवडणुकीत जेवढी मतं प्रकाश आंबेडकर यांना मिळाली..जवळपास तेवढ्याच मतांनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला.

2014 च्या निवडणुकीतही सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे उमेदवार होते. शिंदेंना 3 लाख 68 हजार 205 मतं मिळाली. सुशीलकुमार शिंदेंच्या विरोधात भाजपनं ऐनवेळी शरद बनसोडे यांना उमेदवारी दिली. मोदींच्या लाटेत बनसोडेंनी तब्बल 5 लाख 17 हजार 879 मतं घेतली.

2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला. सुशीलकुमार शिंदेंचं वय जवळपास 81 वर्षे आहे. त्यामुळं त्यांनी याआधीच आपण लढणार नसल्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतलीय.

सोलापूरच्या जागेबाबत स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशीही चर्चा करु असं सूचक विधान केलंय.. सुशीलकुमार शिंदे लढणार नसल्यानं काँग्रेसकडं स्ट्राँग उमेदवार नाही. त्यामुळं ही जागा काँग्रेस राष्ट्रवादीला सोडणार का हे पाहावं लागेल. भाजपचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी जात प्रमाणपत्रामुळं अडचणीत आले आहेत.

त्यामुळं भाजपचा पुढचा उमेदवार कोण असणार ही उत्सुकता आहे. जर ही जागा राष्ट्रवादीला गेली तर त्या बदल्यात काँग्रेसला कुठला मतदारसंघ मिळणार याचीही चर्चा सुरु आहे.

2019 ची लोकसभा सोलापुरातून लढलेल्या प्रकाश आंबेडकरांनी सध्या ठाकरे गटासोबत युती केलीय. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीही प्रकाश आंबेडकरांनाच पाठिंबा देणार का?

अशा अनेक शक्यताही सध्या वर्तवल्या जात आहेत. या सर्व शक्यता आणि चर्चा सध्या प्राथमिक पातळीवर आहेत. मात्र त्याआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झालंय.

रोहित पवारांनी वादावर टाकला पडदा ; पहा त्यांनी काय ट्विट केलंय

“आमदार प्रणिती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करत आहेत. पण कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया,” अशी संयमी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.प्रणिती शिंदेरोहित पवार

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 24, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सातबारा, दाखले अन् मोजणी अर्ज आता थेट हातात; सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत भव्य शिबिर; तुमच्या मतदारसंघात शिबिर कधी आणि कुठे?

July 23, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 22, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
Next Post
मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

धक्कादायक! मंगळवेढ्यात तरस प्राण्याची क्रूर हत्या; एकाला कोठडी, चार जण फरार

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 24, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

July 24, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

July 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सातबारा, दाखले अन् मोजणी अर्ज आता थेट हातात; सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत भव्य शिबिर; तुमच्या मतदारसंघात शिबिर कधी आणि कुठे?

July 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा