टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूर अर्बन सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीच आपला अर्ज मागे घेत सार्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
दरम्यान, विरोधी समविचारी आघाडीने केलेले अपील सहायक निबंधक पुणे यांनी फेटाळून लावल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
या निवडणुकीत मनसेचे नेते दिलीप धोत्रे व सहकार्यांनी समविचारी आघाडी स्थापन करून परिचारक गटाला आव्हानं दिले होते. मात्र, त्यांचे सर्व अठरा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अवैध ठरविल्याने त्यांनी सहायक निबंधक पुणे यांच्याकडे दाद मागितली होती.
मात्र, तेथे ही विरोधकांना दिलासा मिळाला नाही. सर्व उमेदवारी अर्ज बुधवारी नामंजूर करण्यात आले.
दरम्यान, आज १२ जानेवारी हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सत्ताधारी परिचारक गटाने सतरा जागांसाठी अठरा अर्ज दाखल झाले होते.
गुरूवारी सकाळी प्रशांत परिचारक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यामुळे परिचारक गटातील कार्यकर्त्यांसह विरोधकांमधून देखील आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, प्रशांत परिचारक यांचे चुलत बंधू राजाराम परिचारक यांचा संचालक मंडळात समावेश आहे.
प्रथमच त्यांना बँकेवर काम करण्याची संधी मिळाली आहे. पंढरपूर अर्बन बँकेच्या सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात ३१ शाखा असून २ हजार ९०० कोटीची उलाढाल आहे. ११० वर्षाची ही बँक सोलापूर जिल्ह्यात नामांकीत म्हणून ओळखली जाते.
परिचारक गटाचे आता सतरा जागांसाठी सतराच अर्ज शिल्लक असून यात राजाराम परिचारक, रजनीश कवठेकर, हरीश ताठे, सतीश मुळे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, पांडुरंग घंटी, ऋषिकेश उत्पात, गणेश शिंगण, अनंत कटप, अमित मांगले, व्यंकटेश कौलवार, मनोज सुरवसे, गजेंद्र माने, अनिल अभंगराव, माधुरी जोशी, डॉ. संगीता पाटील यांचा समावेश आहे.
बँकेच्या संचालक पदभारातून मुक्त होत आहे
अर्ज माघारी घेतल्यानंतर परिचारक म्हणाले, यामध्ये काही वेळा थांबणे ही गरज बनते. २००२ मोठे मालक तथा स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी बँकेत सेवेची संधी दिली होती. वीस वर्षानंतर आता नवीन युवकांना संधी देऊन संस्था भविष्यात वाढली पाहिजे, टिकली पाहिजे.
यासाठी नवीन पिढी तयार झाली पाहिजे. या दृष्टीकोनातून बँकेच्या संचालक पदभारातून मुक्त होत आहेत. तसेच आपल्या राजकीय जीवनाचा संस्थेवर परिणाम होवू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याने त्यांनी नमूद केले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज