टीम मंगळवेढा टाईम्स ।
तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतील ऑपरेशन परिवर्तन उपक्रम राबविल्याबद्दल लोकहितासाठी पोलिसिंग व गुन्हेगारांना दोषी ठरविणारे
सर्वोत्तम युनिट म्हणून सोलापूर ग्रामीण पोलिसाचा गौरव मुंबईत होणार आहे. याबाबतची घोषणा नुकतीच पोलिस महासंचालक कार्यालयाच्या वतीने करण्यात आली.
दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलिसांच्या कामगिरीचा आढावा पोलिस महासंचालक कार्यालयाच्या वतीने घेतला जातो. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट पोलिस घटकांतर्गत सोलापूर ग्रामीण पोलिसाचा द्वितीय क्रमांक आला आहे.
तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तनमधून अवैध हातभट्टी निर्मिती करणाऱ्यांचे सन्मानपूर्वक व्यवसाय करण्यास परावृत्त करणे,
दारू गाळणाऱ्या महिलांच्या हाताला रोजगार मिळवून देणे, अवैध धंदे बंद करण्याविषयी सातत्याने प्रबोधन, युवक व युवतींना स्वयंरोजगार,
शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे यासह अशा अनेक लोकहितांचे उपक्रम राबविल्याबद्दल ग्रामीण पोलिसांचा गौरव मुंबईत होणार आहे.(स्त्रोत: लोकमत)
यापुढील काळातही ऑपरेशन परिवर्तनचा उपक्रम सुरूच
तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक परिश्रमामुळेच हा गौरव होत आहे. यापुढील काळातही ऑपरेशन परिवर्तनचा उपक्रम सुरूच ठेवण्यात येणार आहे. – शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज