पंढरपूर । राजेंद्र फुगारे
शेळवे (ता.पंढरपूर) येथील युवा ग्रामीण साहित्यिक अंकुश गाजरे यांना श्री.कामेरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था
यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या एक दिवशीय मातृस्मृती ग्रामीण साहित्य संमेलनात राज्यस्तरीय हौसाई मातृस्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम रुपये दोन हजार असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील, संमेलनाध्यक्ष- श्रीकांत पाटील, प्रसिद्ध कथाकार आप्पासाहेब खोत, आयुर्वेदाचार्य बाबुशेठ पांडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार लेखक अंकुश गाजरे यांच्या “सारीपाट” या कथासंग्रहाला जाहीर झाला होता. यापूर्वी या पुस्तकाला दहा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लेखक अंकुश गाजरे यांचे “अनवाणी”, “गावमातीतली माणसं”, “सारीपाट”, “चांदण्यातली अमावस्या”, “कथा सोलापूरी” आदी पुस्तके प्रकाशित असून त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातून अंकुश गाजरे यांचे अभिनंदन होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज