टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातून एका 17 वर्षीय मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील पिडीत मुलीचे वडील तथा फिर्यादी हे दि.23 रोजी सकाळी 8.00 वा. मजुरीसाठी बाहेर गेले होते. शनिवारी सकाळी 7.00 वा. मुलगा व मुलगी शाळेला गेल्याने पिडीत मुलगी एकटीच घरी होती.
फिर्यादी हे कामावरून परत आल्यानंतर दुपारी 2.00 वा. पिडीत मुलगी घरी दिसून आली नाही म्हणून ती कुठे गेली याबाबत मुलाकडे चौकशी केली असता आम्ही 11.00 वा. घरी आलो
तेव्हापासून पिडीत मुलगी घरी नसल्याचे सांगण्यात आले.फिर्यादीने शेजारी व इतर नातेवाईकाकडे चौकशी केली असता आमच्याकडे आली नसल्याचे सांगितले.सर्वत्र शोध घेतला
मात्र ती मिळून आली नसल्याने फिर्यादीची खात्री झाली 17 वर्षीय मुलीला कायदेशीर रखवालीतून अज्ञात कारणावरून,अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.दरम्यान,त्या मुलीचे वर्णन -रंग निमगोरा,उंची 5 फुट,चेहरा गोल,अंगात आभाळी रंगाचा टॉप,काळया रंगाची पँट,नाक सरळ,
नजर थोडी तिरकी अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या निदर्शना आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज