टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी व त्यांची पत्नी दि.11 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वा. शेतावर कामावर गेले होते. सदर वेळी घरामध्ये फिर्यादीच्या दोन्ही मुली होत्या.
यातील फिर्यादी पती पत्नी सायंकाळी 6.00 वा. घरी आले. तेव्हा 17 वर्षीय मुलगी घरी दिसून आली नाही.
याबाबत अन्य दुसर्या मुलीकडे चौकशी केली असता ती अर्ध्या तासापुर्वी मैत्रीणीच्या घरी जाते म्हणून निघून गेली असल्याचे सांगितले.पालकांनी रात्री 7.00 पर्यंत त्या मुलीची वाट पाहिली मात्र ती घरी आली नाही.
मैत्रीणीच्या घरी व आजूबाजूला तीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. फिर्यादीची खात्री पटली की अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेली असल्याने अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीचे वर्णन पुढीलप्रमाणे अंगात हिरव्या रंगाचा टी शर्ट,जीन पँट,काळया रंगाची ओढणी,कानात झुबे,सोबत मंगळसुत्र,अंगाने मध्यम,शिक्षण 12 वी
अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी बोराळे बीटचे तपासिक अंमलदार पोलिस हवालदार महेश कोळी यांचेशी संपर्क साधावा आसे अहवान करन्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज