टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील नगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये स्वच्छता नाही, इमारतीच्या अवस्था बघण्यासाठी या मुख्याधिकाऱ्यांना वेळ नाही न. पा. शाळा नंबर चार मध्ये शाळेच्या मैदानावरती मुरुम म्हणून मोठमोठे दगड टाकले आहेत ते डस्ट टाकून प्लेन करून द्या अशी पालक वर्गातून मागणी होत असताना
मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे मात्र झोपेची सोंग घेत आहेत. जिथे पाकीट आहे तिथे काम होते असा हा या अधिकाऱ्याचा मंत्र आहे.
परंतु या अधिकाऱ्यांनी मंगळवेढा शहरातील सामान्य लोकांच्या मुलांच्या शिक्षणाचे तीन तेरा नऊ अठरा करून ठेवले आहेत. कारण या अधिकाऱ्यांना शाळेत जाऊन शाळेची गुणवत्ता, तिथे शिक्षक वर्ग कसा आहे.
शाळेचे शालेय पोषण कसे आहे, इमारती कशा आहेत, शाळेला गेट नाहीत, शाळेमधील बाथरूम स्वच्छ आहेत का, शाळेमध्ये पाण्याची सोय आहे का, काही शाळांमध्ये तर पाणी आहे.
परंतु पाईप फुटलेल्या अवस्थेत आहेत, अशी शाळेची बिकट होत चाललेल्या मंगळवेढा शहरातील शाळांची अवस्था पाहून प्रहार संघटनेने या झोपलेल्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विरोधात जागरण गोंधळ घालून या नगरपालिकेला जागे करण्याचे ठरविले आहे.
दि.२४ रोजी नागणेवाडी येथील न. पा. नं चार शाळांमध्ये या अधिकाऱ्याने या शाळेकडे फिरकुन सुद्धा बघितले नाही त्यामुळे येथील पालक वर्ग प्रहार
संघटनेच्या पाठिशी ठामपणे उभा राहून त्यास सहमत आहे असा सुर पालक वर्गातून निघाल्यामुळे प्रहार संघटनेचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळ घालण्याचे ठरविले आहे.
जो पर्यंत डस्ट टाकून देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार आहे या जागरण गोंधळ आंदोलनासाठी तुळजापूरहून गोंधळी,मुरळी डस्ट टाकून द्या अशी मागणी केली होती परंतु, जोगती मागवले आहेत. त्यामुळे हे आंदोलन एक वेगळेच होणार आहे असे समाधान हेंबाडे यांनी सांगितले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज