टीम मंगळवेढा टाईम्स ।
शासनस्तरावर पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस पाटील संघटनेच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी आनंदा रायबान यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पोलीस पाटील यांच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी अहोरात्र झटत शासनाला पोलीस पाटील यांचे स्थान व त्यांच्या गावातील कामगिरी गावकामगार संघटना करत आहे व त्यांच्या विविध समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावकामगार पोलीस पाटील संघटनेने काम केले आहे.

माजी पोलीस पाटील जगदेव पाटील व माजी उपाध्यक्ष बळवंत पाटील यांनी मंगळवेढा पोलीस पाटील संघटना कार्यकारणी यादी जाहीर केली.
यामध्ये उपाध्यक्षपदी संजय भारत मेटकरी, खजिनदार पांडुरंग हनुमंत सुतार, सचिव संदीप वसंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
तर सदस्य म्हणून संजय भारत गरंडे, भीमाशंकर शिवाप्पा पाटील, बिराप्पा सिद्धाप्पा माळी, महादेव गणपती शिंदे, संतोष मर्याप्पा धंगेकर, सुहास दत्तात्रय डोके,

मधुकर विठ्ठल पाटील, जोतिबा रावसाहेब कांबळे, बापूसाहेब कृष्णा देवकते, सुनील मच्छिंद्र फटे, नारायण महादेव खांडेकर या सर्वांची निवड माजी पोलीस पाटील जगदेव पाटील, बळवंत पाटील व हिम्मत पाटील यांनी केली सदर बैठकीस तालुक्यातून सर्व पोलीस पाटील हजर होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











