mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दोन बायका फजिती ऐका! जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यात खळबळ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 5, 2022
in क्राईम, सोलापूर
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

टीम मंगळवेढा टाईम्स। 

एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींशी विवाहकरणं नवरदेवाच्या अंगलट आलं आहे. भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल झाला आहे.

याप्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी पोलिसात याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

अतुल उत्तम अवताडे या महाळुंग परिसरातील गट नंबर दोनमध्ये राहणाऱ्या तरुणाने 2 डिसेंबर रोजी अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला होता.

या अनोख्या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते.

मुंबई येथील दोन जुळ्या आय टी इंजिनियर मुलींनी एकाच मांडवात एका तरुणासोबत अनोखा विवाह केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे घडली.

नवरदेव अतुल अवताडे हा माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. कांदिवली इथं आय टी इंजिनियरिंग करून गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीत असणाऱ्या पिंकी मिलिंद पाडगावकर आणि रिंकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या बहिणींनी अतुलशी एकाच वेळी एकाच मांडवात विवाह केला आहे.

पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी लहानपणापासून दिसायला एकसारख्या आहेत. त्यांना एकमेकींचा इतका ओढा असून आजवर त्या दोघी एकाच पानात बसून जेवण करतात. त्यांना बालपणापासून मरेपर्यंत एकत्र राहायचे असल्याने त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

पिंकी आणि रिंकी यांना एकत्र राहण्यासाठी एकच नवरा हवा होता. अखेर अवताडे आणि पाडगावकर कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली. अकलूज वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे 2 डिसेंबर रोजी हा अनोखा विवाह संपन्न झाला होता.

मूळचा माळशिरस तालुक्यातील असणाऱ्या अतुल या तरुणाचा पाडगावकर कुटुंबाशी संबंध आला. या मुलींच्या वडिलांचे काही दिवसापूर्वी निधन झाल्यानंतर या मुली आईसोबत राहत होत्या.

पाडगावकर कुटुंबातील आई व दोन मुली आजारी पडल्यावर अतुल यांच्या गाडीतून त्या दवाखान्यात जात असत. याचवेळी अतुलने पाडगावकर कुटुंबाची आजारपणात सुश्रुषा केल्यानं त्यांच्यातील जवळीक वाढली होती.

अखेर 2 डिसेंबर रोजी अतुल अवताडे यांनी पिंकी आणि रिंकी पाडगावकर या दोन्ही तरुणींशी एकाच मांडवात विवाह केला. या अनोख्या विवाहाला दोन्हीकडील जवळपास 300 पाहुणेमंडळी लग्नासाठी गलांडे हॉटेलमध्ये जमले होते.

अतिशय थाटात झालेल्या या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर याची सर्वत्र चर्चा सुरु झाली होती.

कायदा काय सांगतो? – भारतीय दंड विधान 494 नुसार पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करता येत नाही. पती किंवा पत्नी जिवंत असताना ज्याही जोडीदाराने दुसऱ्याशी लग्न केल्यास ते लग्न कायद्याने ग्राह्य धरले जात नाही. असे झाल्यास दुसरे लग्न करणाऱ्या पतीला किंवा पत्नीला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते आणि दंड देखील होऊ शकतो.

द्विभार्या प्रतिबंधक कायदा म्हणजेच काय? – (Bombay Prevention Of Hindu Bigamous Marriages Act 1946) या कायद्यानुसार हिंदू विवाहित पुरुष, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न करू शकत नाही. हा स्वतंत्र कायदा आहे आणि प्रत्येक राज्याने असा कायदा तयार केलेला आहे. शीख, ख्रिश्चन, पारशी आणि जैन धर्मासाठीही हेच तत्वे सांगणारे स्वतंत्र कायदे आहेत.

स्वखुशीला मान्यता – भारतीय दंड विधान 494 नुसार पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करता येत नाही. मात्र, स्वखुशीने जर दोन्ही पत्नी राहत असतील तर तो गुन्हा ठरत नाही असे असा कायदा सांगतो. भारतात द्विभार्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे.

पण समजा दोन्ही पत्नी स्वखुशीने आणि सहमतीने जर नांदत असतील तर हा गुन्हा ठरत नाही. कारण देशातील अनेक भागात दोन लग्नांची पद्धत दिसून येते. जर त्या मुली एकाच पतीसोबत राहण्यास तयार असतील तर इतर व्यक्ती त्यात काही हस्तक्षेप करू शकत नाही असही कायदा सांगतो.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळजनक! बँकेतून पैसे काढून बाहेर येताच वृद्ध शेतकऱ्याची पिशवी कापली; घरकुल योजनेचे ५० हजार लंपास; मंगळवेढ्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

April 18, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 18, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 15, 2026
Next Post

खरेदी केली 30 हजारांची बक्षिसमध्ये  15000 रुपयेची वस्तू मिळाली; अमर  इलेक्ट्रॉनिक्सचा दिवाळी लकी ड्रॉ संपन्न

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 18, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळजनक! बँकेतून पैसे काढून बाहेर येताच वृद्ध शेतकऱ्याची पिशवी कापली; घरकुल योजनेचे ५० हजार लंपास; मंगळवेढ्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

April 18, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

धक्कादायक! खेळता खेळता शेततळ्यात पडून दोन वर्षीय चिमुरड्याचा अंत; मंगळवेढ्यातील हृदयद्रावक घटना

April 18, 2026
​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा