पंढरपूर । राजेंद्र फुगारे
बांधकाम करत असताना तोल जाऊन उंचावरून पडल्याने ब्रह्मदेव जनार्धन ताड (वय.44 रा.गोपाळपूर ता.पंढरपूर) या बांधकाम व्यवसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना काल दुपारी 4 च्या सुमारास पंढरपुरात घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत ब्रह्मदेव ताड हे सेंट्रींगचे काम करीत होते. अचानक तोल जाऊन उंचावरून पडल्याने त्याच्या डोक्याला उजव्या हाताला गंभीर मार लागला.
त्यानंतर त्यांना प्रथमोपचारासाठी गणपती हॉस्पिटल व लाईफ लाईन हॉस्पिटल पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल केले होते.
मात्र पुढील उपचारासाठी करता सी एन एस हॉस्पिटल सोलापुर येथे नेण्यास सांगितले तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज