टीम मंगळवेढा टाईम्स ।
पोलिसांनी लोकप्रतिनिधीच्या बरोबर योग्य समन्वय करून काम केले पाहिजे. जनतेतून लोकप्रतिनिधींना निवडून दिले जाते त्यामुळे जनता प्रश्न विचारत असते असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
मंगळवेढा येथील नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आ.समाधान आवताडे, आ.सुभाष देशमुख, आ.सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, पोलीस विभागात होणारा बदल कौतुकास्पद आहे. जेवढे कार्यालये हे चांगले तितकेच काम चांगले झाले पाहिजे. पूर्वी कार्यालयात अधिकारी बसत नव्हते त्यांना आता नविन सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र बातमी कळत आहे. त्यामुळे लोकांनी सत्यता पडताळणी करून घेतली पाहिजे. पोलिसांना आता अत्याधुनिक शस्त्रे दिली जात आहे. सायबर क्राईमच्या अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत.
सध्या भीमा नदीतून बेसुमार वाळू उपसा होत आहे. याला अटकाव करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत. आमच्या सरकारने मोठी पोलीस भरती काढली आहे. त्यामुळे तरुणांना आता हक्काची नोकरी मिळणार आहे.
लोकांची अडचण न होता लोकांची सोय झाली पाहिजे. सगळीकडे आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे घरी बसून तक्रार दाखल करता येईल.पोलीस अधीक्षक यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी विशेष मोहीम राबवावी तर आपण लोकांचे सेवक आहोत. पोलिसांनीही भान ठेवून काम केले पाहिजे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
आ.समाधान आवताडे यांच्या रुपात या मतदारसंघाचे उद्याच्या भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
आ.समाधान आवताडे बोलताना म्हणाले की, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातनंतर आता चोखामेळा चौक हळूहळू रिकामा होत आहे. सगळी शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आली पाहिजेत हा शासनाचा नियम आहे.
सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय जगदाळे व आता राजश्री पाटील यांच्या पुढाकाराने हे कार्यालय सुरू झाले आहे. पोलिसांनी सत्यता पडताळून गुन्हे दाखल केले पाहिजेत असे ते म्हणाले.
याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, धनश्रीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,
खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, बाबुराव गायकवाड, दामाजी चेअरमन शिवानंद पाटील, भाजप शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, मारुती वाकडे, रेवनसिध्द लिगाडे, बबलू सुतार, माजी नगरसेवक अजित जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवराज घुले, लहू ढगे, प्रा.निवृत्ती पवार,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती बालटे तर आभार आपण पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज