टीम मंगळवेढा टाईम्स ।
तावशी (ता.पंढरपूर) येथे रात्री सव्वाबाराच्या सुमारास बनावट दूध बनविण्यासाठी आवश्यक असणारी ६०० किलो पावडर या गाडीतून त्या गाडीत टाकताना तावशी (ता.पंढरपूर) येथील दोन ग्रामस्थांच्या मदतीने तालुका पोलिसांनी पकडली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , तावशी ( ता . पंढरपूर ) गावच्या हद्दीमध्ये गुरुवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास एच १३ डीक्यू २०५३ या संशयित वाहनातून ओमिनी गाडीमध्ये पावडरच्या बॅग ठेवत होते.
हे सचिन विष्णू सिंगन व सागर सिंगन ( रा . तावशी ता . पंढरपूर ) यांना दिसले . त्या दिशेने सिंगन बंधू जाताच ओमनी गाडी व गाडी चालक पळून गेले.
सचिन सिंगन यांनी टेम्पो चालकास थांबवून या गाडीमध्ये नक्की काय माल आहे. याबाबत विचारणा केली असता टेम्पोचालकाने या गाडीमध्ये बनावट दूध तयार करण्यासाठी लागणारी पावडर असल्याचे सांगितले.
ही माहिती मिळताच पोनि मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोना परशुराम शिंदे, हनुमंत भराटे घटनास्थळी जाऊन वाहन ताब्यात घेतले.
ती पावडर यांच्याकडून विकत घेतली होती
या टेम्पो चालकाचे नाव श्रीपाद विजयकुमार तारळेकर (रा.रुक्मिणीनगर,पंढरपूर) असल्याचे समजले वाहनचालकाकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी ती पावडर ही बंडू लेंडवे (रा.आंधळगाव ) यांच्याकडून विकत घेतली होती.
ती पावडर दूध डेअरी चालकांना विक्री करीत असल्याचे सांगितले. सचिन विष्णू सिंगन व टेम्पो चालक श्रीपाद विजयकुमार तारळकर यांच्या सांगण्यानुसार
ती पावडर दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे , असे पोनि मिलिंद पाटील यांनी अन्न औषध प्रशासनाला कळविले आहे.
त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी पावडरची तपासणी करून पावडरचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
पावडरमुळे मानवी जीवितास धोका होऊ शकतो काय ?
पावडरच्या १५ पिशव्या टेम्पोसह ताब्यात घेतल्या असून संशयित पावडरची तपासणी होऊन पावडरची विक्री करण्यास परवानगी आहे काय ? या पावडरमध्ये मानवी जीवितास अपायकारक घटक आहेत काय ? तसेच पावडर ही दुधामध्ये भेसळ केल्यावर त्यापासून मानवी जीवितास धोका होऊ शकतो काय ? याबाबतची तपासणी होऊन पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे पत्र अन्न व औषध विभागाला दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज