टीम मंगळवेढा टाईम्स।
निंबोणी ता.मंगळवेढा येथे सहारा बाल सेवा आश्रम हे भटके विमुक्त अनाथ निराधार वंचितासाठी हक्काचे घर ठरत असल्याचे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

मारुती शिंदे यांनी स्थापन केलेल्या सहारा बाल सेवा आश्रमाचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर, सहारा बाल सेवा आश्रमचे संस्थापक अध्यक्ष मारुती शिंदे, छावा क्रांतिवीर सेनेचे कार्याध्यक्ष गणेश माने, गणेशवाडीचे सरपंच संतोष इंगोले, कचरेवाडीचे उपसरपंच भगवान इंगोले, माळशिरसचे गोरक्ष धर्मरक्षा अध्यक्ष संजय जगताप, सचिव दादाराव शिंदे, नंदकुमार जाधव आदीजन उपस्थित होते.

आमदार आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, मारुती शिंदे यांनी भटक्या विमुक्त अनाथ मुलांसाठी आश्रम स्थापन करून पुण्य कमावण्याचे काम केले आहे.
मंगळवेढा तालुक्यात पहिल्यांदाच अनाथ आश्रम सुरू झाल्यामुळे परिसरातील व तालुक्यातील अनाथ मुलांसाठी हे आश्रम 24 तास खुले आहे.

अनाथ मुलांसाठी राहण्याची व जेवणाची तसेच पहिली ते दहावीपर्यंत शाळा शिकवण्याची जबाबदारी मारुती शिंदे यांनी घेतलेली आहे त्यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंगळवेढा तालुक्यातील 19 गावातील भटक्या विमुक्त जाती समाजाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










