टीम मंगळवेढा टाईम्स ।
मोहोळ तालुक्यातील पापरी येथे द्राक्षबागेची छाटणी करुन सदर बागेस डॉरमँक्सचे पेस्ट लावुन त्यानंतर सुतळीने द्राक्ष बागेतकांड्या बांधत असताना बेशुद्ध पडल्याने एका युवकाचा मृत्यु झाल्याची काल घडली आहे.
याबाबत मुलाचे वडील गोरख मनोहर गायकवाड यांनी पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ता. ३ रोजी दिवसभर मयत अक्षय याने शेतातील इतर मजुरासोबत द्राक्ष बागामध्ये बाग छाटुन सदर द्राक्ष बागेस डॉरमँक्स पेस्ट लावली होती.
त्यानंतर अक्षय दुपारी ४.३० वा. सुमारास ट्रॅक्टर घेवुन सर्व मजुरांना पेनुर येथे सोडून परत सायंकाळी ६ वा.परत घरी आला होता.
त्यानंतर पुन्हा तो द्राक्षे बागेमध्ये जाऊन सुतळी बांधण्याच्या कामासाठी शेतात गेला होता.
अक्षयचे वडील गोरख सायंकाळी ७ च्या दरम्यान घरी आल्यानंतर अक्षय बागेतुन घरी न आल्याने अक्षय यास फोन केला असता त्याने फोन उचलला नाही.
त्यामुळे वडील गोरख यांनी बॅटरी घेऊन शेतात गेले असता अक्षय हा जमिनीवर झोपलेला दिसला. त्यावेळी त्यास उठविण्याचा प्रयत्न केला तो उठला नाही.
तो बेशुद्धावस्थेत होता. त्यामुळे अक्षय यास वडीलांनी पुतण्या प्रवीण सुरेश गायकवाड यास फोन करुन सदर घटनेबाबत कळविले.
थोड्या वेळात प्रविण तेथे आला व त्याचे चारचाकी गाडीत घालुन अक्षय यास पेनुर येथील डॉक्टरांच्या उपचारासाठी आणण्यात आले.
मात्र तेथील डॉक्टरांनी मोहोळ येथे घेऊन जाण्यास सांगितल्याने तात्काळ ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे घेऊन आलो असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करून अक्षय याचा उपचारापुर्वीच मयत झालेचे सांगितले.
अतिशय कष्टाळू अशा युवक शेतकऱ्याचा दुर्दर्वी निधन झाल्याने हळहळ व्यक्त करित आहेत. पुढील अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज