mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

एलकेपी मल्टीस्टेटमुळे मंगळवेढ्याच्या विकासात मोलाची भर पडणार; आमदार आवताडे यांचे गौरुउद्गार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 25, 2022
in मंगळवेढा
एलकेपी मल्टीस्टेटमुळे मंगळवेढ्याच्या विकासात मोलाची भर पडणार; आमदार आवताडे यांचे गौरुउद्गार

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या सूर्योदय उद्योग समूहात दाखल झालेले एलकेपी मल्टीस्टेट को ओप.सोसायटी या संस्थेची मंगळवेढ्यात शाखा निर्माण झाल्यामुळे या तालुक्याच्या विकासात मोलाची भर पडली असल्याचे गौरवउद्गार आमदार समाधान अवताडे यांनी काढले.

मंगळवेढा शहरातील सरकार चौकात दादासाहेब नागणे शॉपिंग सेंटर या ठिकाणी एलकेपी मल्टीस्टेटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

यावेळी मंचावर विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथ भालके, आमदार ऍड.शहाजी पाटील यांचे राजकीय प्रतिनिधी सागर पाटील, धनश्री परिवाराचे प्राध्यापक शिवाजीराव काळुंके, भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत, जकराया शुगरचे सचिन जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले की, अनिल भाऊंचे वित्तीय क्षेत्रामध्ये मोठे योगदान असून शेतकरी, व्यापारी वर्ग व उद्योजक यांच्यासाठी ही संस्था नक्कीच वरदान ठरेल.

प्राध्यापक काळुंगे सरांनीही मंगळवेढेकरांची आर्थिक शिस्त कौतुकास्पद असल्याचे सांगत या संस्थेलाही शुभेच्छा दिल्या.

सूर्योदय उद्योग समूहाचे माध्यमातून अनिल इंगवले यांनी गेली बारा वर्षापासून अथक परिश्रम घेतले असून जगन्नाथ भगत, बंडोपंत लवटे, सुभाष दिघे यांना सोबत घेऊन आर्थिक व उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठी भरारी घेतली आहे.

या उद्योग समूहात दाखल झालेल्या एलकेटी मल्टीस्टेटच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंगळवेढा तालुका व परिसरामधून विविध पक्षांचे नेते मंडळी, आजी-माजी पदाधिकारी ,व्यापारी बांधव ,विविध संस्थांचे प्रमुख ,महिला भगिनी तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकांमधून चेअरमन अनिल इंगवले यांनी आजवरच्या वाटचालीची पार्श्वभूमी सांगत संस्थेच्या वाटचालीविषयी आपली भूमिका विशद केली. शेवटी आभार संस्थेचे संचालक जगन्नाथ यांनी मांनले.

मंगळवेढा शहराच्या मध्यवर्ती भागात, प्रशस्त इमारत व सुसज्ज फर्निचर आणि अनुभवी संचालक व कर्मचारी वर्ग यामुळे ही शाखा लवकरच नावरूपास येणार असल्याच्या भावना देखील यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजित कदम, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात, राष्ट्रवादीचे नेते तानाजी काकडे, संचालक बसवराज पाटील, औदुंबर वाडदेकर, निलाबाई आटकळे, महादेव बिराजदार गुरुजी, आकाश पुजारी, माजी नगराध्यक्ष भारत नागणे, अजित जगताप, प्रदीप खांडेकर, संजय चेलेकर, सचिन नागणे, प्रा.विनायक कलुबर्मे आदीजन उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: एल के पी मल्टिस्टेटमंगळवेढायोजना शुभारंभशुभारंभ

संबंधित बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 30, 2026
Next Post
मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली 'इतक्या' दिवसाची पोलिस कोठडी

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..