टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरानजीक पाटखळ रोडवर असलेल्या मोकळया प्लॉटच्या जागेत कडबा,जळण,शेणखत टाकलेले काढा असे एका 40 वर्षीय महिलेने म्हटल्यावर मी काढणार नाही,
तुच इथली जमीन विकून जा तुझी इथे रहायची लायकी नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दिलीप भिमराव दत्तू, रवी दिलीप दत्तू, राहुल हेंबाडे या तीघाविरूध्द अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी रतन मेकाप्पा मोरे यांनी पाटखळ रोड येथे कान्होपात्रा मंदिराशेजारी गट नं. 2393/2/ब आरोपी दिलीप दत्तू यांची शेतजमीन असून ती गुंठेवारी केली आहे.
दरम्यान यामधील जमीन मुक्तार सल्लाउद्दीन इनामदार यांनी एक महिन्यापुर्वी हरी धर्मा झांबरे यांचे शेजारी खाते क्रमांक 8177 ही दोन गुंठे जागा खरेदी केली आहे.

दि.19 आक्टोबर रोजी सकाळी 7.00 वा. यातील फिर्यादी व तीचे पती मिळून त्यांनी खरेदी केलेल्या गुंठेवारी जमिनीत पाहिले असता त्यामध्ये आरोपीने मोकळया जागेत कडबा,जळण,शेणखत टाकलेले दिसले.
फिर्यादीने आमच्या जागेत ठेवलेले सरपण काढा असे म्हणताच मी काढणार नाही तुच इथली जमीन विकून जा,तुझी इथे रहायची लायकी नाही असे म्हणून

फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील या करीत आहेत.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










