mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

युवा महोत्सवाचे विजेतेपद शिवाजी द बॉस; गोल्डन गर्ल, गोल्डन बॉय ‘या’ विद्यार्थ्यांना बहुमान; विविध कलेमध्ये बक्षिस मिळविलेली यादी पहा…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2022
in मंगळवेढा, मनोरंजन, सोलापूर
युवा महोत्सवाचे विजेतेपद शिवाजी द बॉस; गोल्डन गर्ल, गोल्डन बॉय ‘या’ विद्यार्थ्यांना बहुमान; विविध कलेमध्ये बक्षिस मिळविलेली यादी पहा…

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठाचा 18 वा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

18 व्या युवा महोत्सवामध्ये सर्वसाधारण विजेते पदाचा मान 91 गुणासह बार्शीच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने तब्बल चार वर्षानंतर पटकावला.

द्वितीय क्रमांक 50 गुणासह संगमेश्वर महाविद्यालयाने तर तृतीय क्रमांक 49 गुणासह शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय अकलूज यांनी पटकावले.

शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम यांच्या पुढाकारामुळे दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान हा महोत्सव झाला.

त्याची पारितोषिक वितरण सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू व भाजप खा.धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. राजेश गोदेवार हे होते.

बार्शीच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाला यापूर्वी विजेत्याचा मान मंगळवेढा येथील युवा महोत्सवात 2017 मध्ये मिळाला होता. आज उत्साही व जल्लोशपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. तत्पूर्वी सकाळी शोभायात्रा काढण्याचे निश्‍चित होते.

परंतु, परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शोभायात्रेवर गंडांतर आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी पडले. मात्र, त्यांच्यातील उत्साहाने तयारी केलेल्या वेशभूषा व नागरिकांना द्यावयाच्या संदेश व त्याच्या फलकाचे महाविद्यालयाच्या प्रांगणात मिरवणूक काढून आनंद केला.

सोलापूर जिल्हयातील 57 महाविद्यालयांनी 29 कला प्रकारामध्ये सहभाग नोंदवला होता. यावेळी एकूण महत्वाच्या पाच कला प्रकारांचे विभागीय विजेतेपद घोषित करण्यात आले.

ललितकला, वाड़.मय, नाट्य या कलाप्रकारामध्ये शिवाजी महाविद्यालय बार्शी, नृत्यकला मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभाग यांनी विभागीय पारितोषिक पटवकले.

गोल्डन बॉय गोल्डन गर्ल म्हणून..

तर संगीत विभागामध्ये डीबीएफ दयानंद महाविद्यालय सोलापूर यांना विजेतेपद मिळाले सर्वांची उत्सुकता लागलेल्या गोल्डन बॉय म्हणून एम. ए. च्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या सुरज काळे तर गोल्डन गर्ल म्हणून सांगोला महाविद्यालयाच्या तृप्ती बेंगलोरकर हिची निवड करण्यात आली.

विजेत्या महाविद्यालय निश्चित झाल्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात जल्लोषात मिरवणूक काढून विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

अॅड. सुजित कदम यांनी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

युवा महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना चांगलं व्यासपीठ कोरोना नंतर उपलब्ध झाले. मी यापूर्वी अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला मला आतापर्यंत केलेल्या कष्टाला युवा महोत्सवाच्या सादरीकरणासाठी मंगळवेढ्याच्या अॅड. सुजित कदम यांनी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कलेच्या सादरीकरणामुळे गोल्डन बॉय होण्यापर्यंत संधी मिळाली.- सुरज काळे, गोल्डन बाय, शिवाजी विद्यालय बार्शी

पहिल्याच प्रयत्नात गोल्डन गर्ल पुरस्कार

पहिल्याच प्रयत्नामध्ये एकांकिका, पथनाट्य, डान्स, स्किप्ट्र, या चार प्रकारात सहभाग घेतला. पहिल्याच प्रयत्नात गोल्डन गर्ल पुरस्कार सादर केलेल्या कलेला परीक्षकाने योग्य निर्णय देत. मला हा पुरस्कार मिळाला मी खूप खूप आनंदी आहे. – तृप्ती बेंगलोरकर, बी.एसी.एस. तृतीय वर्ष, सांगोला महाविद्यालय सांगोला

विविध कलाप्रकारामध्ये बक्षिस मिळविलेली नावे खालीलप्रमाणे,

ललित कला-

*रांगोळी,

१)  शंकरराव मोहिते अकलूज, २) वालचंद कॉलेज सोलापूर स्वेरी गोपाळपूर, ३) कस्तुरबा कॉलेज सोलापूर दयानंद कॉलेज सोलापूर

* कातरकाम:

१) कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर, २) माणदेश महाविद्यालय जुणोनी, ३) संगमेश्वर कॉलेज सोलापूर

* मातीकाम:

१) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी सांगोला कॉलेज सांगोला, २) उमा कॉलेज पंढरपूर प्रतापसिंह कॉलेज अकलूज, ३) वालचंद कॉलेज सोलापूर शंकरराव मोहिते अकलूज कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर

* व्यंगचित्र

१) दयानंद कला व शास्त्र कॉलेज सोलापूर, २) माणदेश महाविद्यालय जुणोनी, ३) शंकरराव मोहिते कॉलेज अकलूज शिवाजी महाविद्यालय बार्शी

*भित्तीचित्रे:

१) संगमेश्वर कॉलेज सोलापूर,२) दयानंद विधी महाविद्यालय सोलापूर  शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, ३) वालचंद कला शास्त्र व दयानंद कला शास्त्र महाविद्यालय सोलापूर

* स्थळचित्रे–

१) शंकरराव मोहिते कॉलेज अकलूज, २) संगमेश्वर कॉलेज सोलापूर वालचंद कला शास्त्र, ३) श्री शिवाजी बार्शी दयानंद कला शास्त्र महाविद्यालय सोलापूर

*निर्मिती चित्रे

१) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी,२) केबीपी पंढरपूर दयानंद कॉलेज सोलापूर  सांगोला कॉलेज सांगोला , ३) संगमेश्वर कॉलेज सोलापूर  कस्तुरबाई शिक्षण शास्त्र महाविद्यालय वसुंधरा कॉलेज सोलापूर

*फोटोग्राफी–

१)श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, २) संगमेश्वर कॉलेज सोलापूर कॉलेज वेलणकर कॉमर्स कॉलेज सोलापूर, ३) श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा, दयानंद विधी महाविद्यालय सोलापूर

*संगित:-

*शास्त्रीय गायन-

१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर अधि विभाग, २) हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय सोलापूर,३) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी

*शास्त्रीय सूरवाद्ये:

१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर अधि विभाग, २) दयानंद महाविद्यालय सोलापूर, ३) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी

*शास्त्रीय तालवाद्य– ़

१) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, २) शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, ३) दयानंद महाविद्यालय सोलापूर

* सुगम गायन

१) हिराचंद नेमचंद कॉमर्स कॉलेज सोलापूर, २) संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा, ३) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर अधि विभाग

*फोक आर्केस्ट्रा

१) दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर, २) शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, ३) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी

*समुहगित–

१) संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, २) दयानंद महाविद्यालय सोलापूर, ३) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधि विभाग

*प्रश्‍नमंजुषा–

१) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, २) श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा, ३) सोलापूर हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स

* वक्तृत्व मराठी

१) संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, २) कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर, ३) शंकरराव मोहिते कॉलेज अकलूज

* वक्तृत्व हिंदी

१) शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, २) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, ३) सोशल महाविद्यालय सोलापूर

* वक्तृत्व इंग्रजी

१) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, २) कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर, ३) वालचंद कॉलेज सोलापूर

*वादविवाद स्पर्धा

1) कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर, 2) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधि विभाग, 3)शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज

काव्य वाचन स्पर्धा

1) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, 2) वसुंधरा कला महाविद्यालय सोलापूर, 3) सोशल महाविद्यालय सोलापूर

कथाकथन स्पर्धा

1) संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, 2) कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, 3) कस्तुरबा कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर

* नाट्य–

**नकला

१) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, २) सोशल महाविद्यालय सोलापूर, ३) सोलापूर विद्यापीठ अधि विभाग

*पथनाट्य

१) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, २) विभागून – दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय मंगळवेढा व सोशल महाविद्यालय सोलापूर, ३) विभागून- सोलापूर विद्यापीठ सोलापूर व शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज

* मुकनाट्य

१) शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, २) विभागून- ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर व श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, ३) विभागून- सोशल महाविद्यालय सोलापूर व  वालचंद महाविद्यालय सोलापूर

*लघुनाटीका

१) विभागून- वसुंधरा कला महाविद्यालय सोलापूर व  शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, २) विभागून – सांगोला महाविद्यालय सांगोला व श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, ३)विभागून माणदेश महाविद्यालयात जुनोनी व  संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा

*एकांकिका

१) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, २) विभागून-  छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर व  संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, ३) विभागून-  सांगोला महाविद्यालय सांगोला व माणदेश महाविद्यालय जुणोनी

*दिग्दर्शन

१) संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, २) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, ३) सांगोला महाविद्यालय सांगोला

* पुरुष अभिनय-

१) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी , २)विभागून- संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर व माणदेश महाविद्यालय जुनोनी, ३) विभागून-  सोलापूर विद्यापीठ अधि विभाग व  कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर

* स्त्री अभिनय–

१) छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर, २) विभागून- सोलापूर विद्यापीठ सोलापूर व ग्रीन फिंगर्स महाविद्यालय अकलूज, ३) दयानंद विधी महाविद्यालय व संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर

*मंच संयोजन-

१) छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर, २) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, ३) दयानंद महाविद्यालय सोलापूर

*शास्त्रीय नृत्य

१) संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, २) पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधी विभाग, ३) वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूराज्य

*लोकनृत्य

१) सोलापूर विद्यापीठ अधी विभाग, २) विभागून- केबीपी महाविद्यालय पंढरपूर व  सांगोला महाविद्यालय सांगोला, ३)विभागून- ए आर बुरला महिला महाविद्यालय सोलापूर व दयानंद महाविद्यालय सोलापूर

शोभायात्रेवर पावसाने फिरवले पाणी

सोलापूर विद्यापीठाच्या १,८ व्या युवा महोत्सवाचा समारोप शोभायात्रेद्वारे असतो मंगळवेढा शहरातील प्रमुख चौकात ही शोभा यात्रा निघणार होती मात्र वरुणराजा बरसल्यामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली तरीही तयारी केलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरातून आपल्या पारंपरिक वेशभूषेत फेरफटका मारून हौस पूर्ण करून घेतली तसेच महाविद्यालयाच्या प्रांगणात देखील शोभायात्रेचा जल्लोष केला, समारोपाच्या दिवशीही विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता.
—————–

ललित विभाग

19 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी

वांग्मय विभाग

 20 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी

नाट्य विभाग

42 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी

नृत्य विभाग

सर्वसाधारण विजेतेपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधि विभाग

संगीत विभाग

16 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद दयानंद महाविद्यालय सोलापूर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: युवा महोत्सव

संबंधित बातम्या

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 26, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! वनविभागामध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून तरुणाची १३ लाखांची फसवणूक; मंगळवेढ्यातील ‘या’ ठगा विरोधात गुन्हा दाखल

August 26, 2025
मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

August 25, 2025
काळजी घ्या! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा चोविसावा बळी; 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

दोन महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली; गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू

August 24, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

खबरदार! कोणत्याही नेत्याचा फोन आलातरी डॉल्बी लावू देणार नाही; पोलीस निरीक्षकांचा बैठकीत इशारा; संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हा निर्णय लागू करा; नागरिकांची मागणी

August 25, 2025
मराठी पत्रकार संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रमोद बिनवडे तर शहराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड; पत्रकारांच्या कल्याणासाठी झटणारी संघटना

मराठी पत्रकार संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रमोद बिनवडे तर शहराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड; पत्रकारांच्या कल्याणासाठी झटणारी संघटना

August 24, 2025
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

मोठी खळबळ! मंगळवेढ्यासह ‘या’ तालुक्यात गूढ आवाज; खिडक्या, दरवाजे हादरले; नागरिक घराबाहेर पळाले

August 23, 2025
Breaking! मंगळवेढ्यात पुराच्या पाण्याने ‘हा’ बंधारा पाण्याखाली; दोन तालुक्याशी संपर्क तुटला

शेतकरी चिंतेत! हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात; मंगळवेढ्यातील ‘हे’ बंधारे पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

August 22, 2025
Next Post
Breaking! मंगळवेढ्यात पुराच्या पाण्याने ‘हा’ बंधारा पाण्याखाली; दोन तालुक्याशी संपर्क तुटला

पिकाला फटका! उजनीमधून भिमेत 50 हजार क्युसेकने विसर्ग, पंढरपुर, मंगळवेढा नदीला तिसऱ्यांदा पूर येण्याची शक्यता?; 'हे' बंधारे जाणार पाण्याखाली

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आर-पार लढाईची घोषणा! गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत धडकण्यावर ठाम; सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करून मुंबईकडे निघा..; मनोज जरांगेंच्या यावेळच्या मागण्या नेमक्या काय?

August 26, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 26, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! वनविभागामध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून तरुणाची १३ लाखांची फसवणूक; मंगळवेढ्यातील ‘या’ ठगा विरोधात गुन्हा दाखल

August 26, 2025
मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

August 25, 2025
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

आता सुट्टी नाही! ही शेवटची फाईट, विजयाचा गुलाल लावायचाय, आता मैदान सोडायचं नाही; बीडमधून मनोज जरांगे पाटलाचा फडणवीस सरकारला थेट इशारा

August 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा