टीम मंगळवेढा टाईम्स ।
युवकांचा भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.
दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात 18 व्या युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी आ.प्रशांत परिचारक, कुलगुरू मृणालिनी फडणवीस, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अँड.सुजित कदम, धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, सौ.मीनाक्षी कदम, सचिवा सौ.प्रियदर्शनी कदम-महाडिक, पवन महाडिक, श्रेणीक शहा, तेजस्विनी कदम, प्रा.शोभाताई काळुंगे आदीजन उपस्थित होते.
आ.आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, सन 2025 साली भारत महासत्ता बनणार असे ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितले होते. त्याची वाटचाल त्या दिशेने चालू असल्याचे दिसत आहे.
युवा शक्ती म्हणजे अशक्य असे काही नाही असा आजचा युवक असून येणाऱ्या काळात अनेक आव्हाने पेलून यश संपादन करण्याची जिद्द आजच्या पिढीला आहे.
युवकांच्या अंगी असलेले सुप्तगुण दाखवण्यासाठी व्यासपीठ सोलापूर विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहे. ऑनलाइन पद्धतीने एक वर्ष युवा महोत्सव झाला यात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जे चांगले आहे ते इथुन घेऊन जावा ते वाईट आहे ते इथेच सोडून जावा असा सल्ला विद्यार्थ्यांना आ.आवताडेंनी दिला.
दुसऱ्या वेळी युवा महोत्सव हा मंगळवेढ्यात होत आहे. आशा संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असे आव्हान देखील आ.आवताडे यांनी केले.
कुलगुरू मृणालिनी फडणवीस बोलताना म्हणाल्या की, येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना याचा फायदा पुढील शिक्षणात होणार आहे. उत्तम लेखक, उत्तम भाषण करणारे, उत्तम संगीतकार असे अनेक युवक पुढील काळात घडतील असे त्या म्हणाल्या.
आ.परिचारक बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांना युवा महोत्सवाच्या निमित्ताने अँड.सुजित कदम यांनी हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे.
लयुवा महोत्सव घेण्यासाठी कुलगुरू हे मागे लागतात पण दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाने पुढाकार घेतला हे कौतुकास्पद आहे.
दलित मित्र कदम गुरुजी यांच्या विचारांचा वारसा अँड.सुजित कदम हे पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आनंदाचा दिवस म्हणजे युवा महोत्सव होय. आपल्या कला सर्वांपुढे सादर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते बोलताना म्हणाल्या की, मंगळवेढ्यात युवा महोत्सव होण्यासाठी इंग्लिश स्कूलने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. निश्चितच याचा भविष्यात त्यांना फायदा होणार आहे. युवा महोत्सव संपल्यावर तितक्याच उत्साहाने अभ्यास करता येईल व यश संपादन मिळेल असे त्या म्हणाल्या.
आज मूकनाट्य, समूहगीत, कातरकाम, प्रश्नमंजुषा लेखी, मराठी-हिंदीइंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, भितीचित्रण, रांगोळी आणि एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.
युवा महोत्सव उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आभार अँड.सुजित बापू कदम यांनी मानले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज