टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा अठरावा युवा महोत्सव 9 ते 12 ऑक्टोंबर दरम्यान मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात होणार असल्याची माहिती शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढ्याचे अध्यक्ष ॲड.सुजीत कदम यांनी दिली.
रविवार दि.9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता युवा महोत्सवचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस असणार आहेत.
आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
तर एकांकिका मंचाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते होणार आहे.
दि.9 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 10 पर्यंत नोंदणी करावी लागणार असून त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
सोमवार दि.10 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 पासून रात्री 10 वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
मंगळवार दि.11 ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ पासून प्रश्नमंजुषा, निर्मितीचित्र, शास्त्रीय गायन, व्यंगचित्रण, लघुनाटिका, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम, लोकनृत्य असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
बुधवार दि.12 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 ते 11 यावेळेत मंगळवेढा शहरातून शुभयात्रा निघणार आहे.
दुपारी 11 वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार असून याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस असणार आहेत.
सिनेअभिनेत्री सैराट फेम आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू तिच्या शुभ हस्ते तर याप्रसंगी प्र.कुलगुरू डॉ.राजेश गादेवार, कुलसचिव श्रीमती योगिनी घारे, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणीक शहा हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून युवा महोत्सवाच्या यजमान पदासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.
त्यानुसार शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संचलित दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाकडून युवा महोत्सव घेण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता.
त्यानुसार आमच्या महाविद्यालया कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने येऊन भेट दिल्या नंतर महोत्सवाची जबाबदारी आमच्याकडे सोपवली आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून विद्यापीठाचा युवा महोत्सव संपन्न झाला नाही विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाढ मिळावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो यंदाचा युवा महोत्सव आमच्या महाविद्यालयात संपन्न होणार आहे.
या काळात विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी आमचे महाविद्यालय तत्पर असेल असे ॲड.सुजित कदम यांनी सांगितले.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम ,सचिव प्रियदर्शनी महाडिक, संचालिका डॉ.मीनाक्षी कदम, तेजस्विनी कदम श्रीधर भोसले, राम नेहरवे, शिवाजी पाटील, यतीराज वाकळे, प्राचार्य रवींद्र काशीद, कल्याण भोसले, जयराम आलदर, अजित शिंदे, रमेश पवार, सुभाष बाबर आदी जण उपस्थित होते
तयारी अंतिम टप्यात
दरम्यान महाविद्यालयातील प्रांगणात मुख्य रंगमंच सह इतर रंगमंच भोजन व्यवस्था स्वागत कमान अशी कामे अंतिम टप्यात आली असून सुमारे दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतील असे सांगण्यात आले असून सेल्फी पॉईंट सह महोत्सवाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्टॉलच्या माध्यमातून खाद्यपदार्थासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तर विद्यार्थी व परीक्षक तसेच मान्यवरांना राहण्यासाठी मंगळवेढ्यातील सर्व मंगल कार्यालय निवास व्यवस्था लॉज हॉटेल यांचे बुकिंग करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेले मंडप वॉटरप्रूफ असून पावसामुळे महोत्सवाला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज