टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील एका गावातील शेतात गवत काढण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय महिलेला तु मला खूप आवडते,
तुला काय पाहिजे ते सांग असे म्हणून तीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी
संदेश शंकर खडतरे, किरण रमेश खडतरे, विलास श्रीपती खडतरे, वनिता शंकर खडतरे, शोभा रमेश खडतरे, सखुबाई विलास खडतरे, रमेश श्रीपती खडतरे (लवंगी ता.मंगळवेढा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी तथा पिडीत महिला दुपारी 3.00 वा. घरातील कामे उरकून एकटीच गवत काढण्यासाठी शेताकडे गेली होती.
यातील आरोपी शंकर खडतरे याने शेताकडे जाण्याचा बहाणा करून ते पिडीतेकडे येवून तु मला खूप आवडते,
तुला काय पाहिजे ते सांग असे म्हणून पिडीतेच्या हाताला धरून ओढून अंगाशी झोंबाझोंबी करून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत पिडीतेने म्हटले आहे.
यावेळी फिर्यादीने घाबरून जोरजोरात आरडाओरडा केल्याने आवाज ऐकून पती पळत आले. व फिर्यादीच्या पतीने आरोपीस याबाबतचा जाब विचारला असता पतीला शिवीगाळी,
दमदाटी करून मारहाण केली. तसेच इतर आरोपीने पळत येवून पिडिता व तीच्या पतीला लाथाबुक्यांनी मारहाण करून
फिर्यादीच्या गळयातील एक तोळयाचे मंगळसूत्र हिसकावून घेवून निघून गेल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज