टीम मंगळवेढा टाईम्स।
कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व सन २०२२ या आर्थिक वर्षाचा आदर्श व्यापारी गौरव सोहळा संपन्न झाला.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
सभेच्या सुरुवातीला संस्थेच्या सर्वसाधारण वार्षिक अहवालाची माहिती सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली. सदरील कार्यक्रमासाठी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना संचालक सिद्धेश्वर आवताडे,
बाजार समितीचे संचालक किसन करे, अजीम शेख, मोहन कोंडुभैरी, सुर्यकांत पाटील, चंद्रकांत गोडसे, तिपण्णा माळी, सुरेश आगलावे, संचालिका मालन गायकवाड यांच्यासह
राजेंद्र सुरवसे, माजी उपसंरपच सुहास पवार, साहेबराव उगाडे, संभाजी पाटील अनुज नकाते, राजाभाउ गंगथडे, यांच्यासह विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य ग्रामपंचायत सदस्य शेतकरी व्यापारी हमाल तोलार अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सन २०२२ मधील आदर्श व्यापारी पुरस्कार विजेत्यांची नावे
डाळिंब विभाग प्रथम क्रमांक मोहन शंकर माळी द्वितीय क्रमांक समर्थ ट्रेडिंग कंपनी मकसुद अब्दुलरहिम बागवान तृतीय क्रमांक राजलक्ष्मी फ्रुट कंपनी मनोज निवृत्ती पाटील ( सांगोला )
भुसार ( अन्नधान्य ) विभागातुन प्रथम क्रमांक मेसर्स सुरवसे आणि कंपनी सत्यजित राजेंद्र सुरवसे द्वितीय क्रमांक नकाते आणि कंपनी पांडुरंग सुर्यकांत नकाते तृतीय क्रमांक मेसर्स माळी आणि कंपनी शरणाप्पा रामचंद्र माळी
कांदा विभाग प्रथम क्रमांक बनसोडे ट्रेडिंग कंपनी नवनाथ रामचंद्र बनसोडे द्वितीय क्रमांक सागर ट्रेडिंग कंपनी मारुती हरी काळे आणि तृतीय क्रमांक अनिल एकनाथ बोदाडे
भाजीपाला विभाग प्रथम क्रमांक वसंतराव रामचंद्र चेळेकर द्वितीय क्रमांक सिद्धेश्वर लक्ष्मण नागणे तृतीय क्रमांक धीरज ट्रेडिंग कंपनी अण्णासाहेब एकनाथ बोदाडे यांना मिळाले.
पुरस्कार विजेत्यांची स्मृतीचिन्ह भेटवस्तू फेटा शाल श्रीफळ देऊन सत्कार करणेत आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव सचिन देशमुख यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज