टीम मंगळवेढा टाईम्स।
उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मंगळवेढा येथे सुरू असलेला कला सप्ताह अर्थात “आर्ट डे” ची सुरुवात खूपच छान झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संत दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. बी.पवार, प्रमुख उपस्थीती म्हणून प्राचार्य.डॉ.डी.जे.साळुंखे, व्यवस्थापन कमिटी चेअरमन विजय बुरकुल व बस व्यवस्थापन प्रमुख बाबासाहेब कोंडूभैरी हे उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यात होणाऱ्या या कला सप्ताह नियोजना बद्दल बोलताना डॉ.एन. बी. पवार सर म्हणाले की, कला ही जीवनात असलीच पाहिजे, कला ही जीवन जगायला शिकवते! नव्हे नव्हे तर..आनंदाने हसून जगवते,
तर अंतःस्थ दुःखाला अभिव्यक्त करण्यासाठी अश्रू रूपाने बाहेर येते, ही कला न जाणणारा माणूस जीवनाचा खरा अर्थ जाणू शकत नाही.
येथे सुरू असलेला हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुणांना वाव देणारा अभिनव उपक्रम आहे.
यातूनच उद्याचा कलाकार उदयास येत असल्याने माझ्या खूप खूप शुभेच्छा अशा अगदी मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया मांडली.
आजच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा, रिव्हस काउंटिंग,वेशभूषा स्पर्धा,गायन/वादन स्पर्धा, अशा पद्धतीचे विविध स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यात आले आहे.
ज्यामध्ये मृदंग,तबला वादन,हार्मोनियम एकल वादन, पियानो वादन,उपशास्त्रीय गायन प्रकार सादर करण्यात आले.
फॅन्सी ड्रेस विभाग परीक्षक म्हणून भैरवनाथ फर्निचर डिझायनर, ह.भ.प. सौ.प्रियांका माने, मेकअप आर्टिस्ट सौ.दिपाली चिखले
तर गायन वादन स्पर्धा परीक्षक म्हणून ह. भ. प. अरुण महाराज शिवशरण तथा संगीत विशारद उदयोन्मुख गायिका कु.प्रियांका क्षीरसागर हे उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक प्रा.सुधीर पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेला हा कार्यक्रमाचा पहिला दिवस आनंदमय वातावरणात पार पडला.
आज दि.२४ रोजी नृत्य स्पर्धा व इतर कार्यक्रम होतील या वेळी पालकांसह इतर दर्दी रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे प्रशाले कडून आवाहन करण्यात येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज