mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पशुपालकांनो! मंगळवेढा तालुक्यातील ‘इतके’ हजार जनावरे लंपी आजारापासून सुरक्षित; मात्र ‘ही’ काळजी घ्यावी लागणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 13, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढयातील पशुपालकांमध्ये घबराहट! 1 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 3 म्हशी व 3 रेडया चोरटयांनी पळविल्या; पोलिस ‘या’ म्हशींचा शोध लावणार का?

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यात 49,342 गायी तर 42,503 म्हैस असे एकूण 91,845 जनावरे असून ही सर्व जनावरे सध्या तरी लंपी या विषाणू आजारापासून सुरक्षित असल्याची माहिती पंचायत समिती तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.सुहास सलगर यांनी दिली आहे.

दरम्यान जि.प.पशुसंवर्धन विभागाकडून येत्या तीन दिवसात लस प्राप्त होणार असून सर्व जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे.

देशभरातील 16 राज्यात 58 हजार गायींना लंपी या संसर्गजन्य आजाराने पछाडल्याने त्या मृत्यूमुखी पडल्याचा आकडा समोर आल्यानंतर महाराष्ट्र शासनानेही पशुधनाच्या जीवाची काळजी घेत संपूर्ण राज्यभर या आजाराबाबत हायअलर्ट केला आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या आजाराला आटकाव करण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण जनावरांचे बाजार भरवणे बंदचे आदेश दिले आहेत.

सध्या मंगळवेढा तालुक्यातील 91 हजार 845 जनावरांना कुठल्याही आजाराची लागन झाली नसून सध्या ते सुरक्षित आहेत. लगतच्या माळशिरस तालुक्यामध्ये काही प्रमाणात संशयित आजाराची जनावरे दिसून आल्याने पशुपालकामध्ये खळबळ उडाली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, मरवडे, नंदेश्‍वर, आंधळगाव, दहिवडी या ठिकाणी पाच टिम तयार करण्यात आल्या असून या टिम संपूर्ण जनावरावर लक्ष ठेवून आहेत.

या जनावरांना 7 हजार लस देण्याचे जि.प.पशुसंवर्धन विभागाने ग्वाही दिली असून ही लस येण्यास अजून तीन दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

सध्या जिल्ह्यामध्ये या लसीचा तुटवडा असल्यामुळे जनावरांच्या प्रमाणात लस उपलब्ध होवू शकत नसल्याचे सांगण्यात आले. लंपी आजार आल्यानंतर घ्यावयाची काळजी व येवू नये

यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत पं.स.पशुसंवर्धन विभागाकडून वेळोवेळी कर्मचार्‍यांच्या व पशुपालक, दूध उत्पादक यांच्या बैठका घेवून मार्गदर्शन केले जात आहे.

मंगळवेढा तालुक्याला लगत कर्नाटक राज्य असल्याने कर्नाटकातून मंगळवेढाकडे जनावरे विक्रीसाठी येणार नाहीत याची खबरदारी घेतली जात असून मरवडे येथील चेकपोस्टला कर्नाटकातून येणार्‍या जनावरांना पायबंद घालावा अशी लेखी पत्र दिले असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

लंपी या जनावराच्या आजारासाठी पशुसंवर्धन विभागाचे सुहास सलगर, डॉ.पांडुरंग हंबरडे, डॉॅ.ब्रह्मानंद कदम, डॉ.रविंद्र बंडगर, डॉ.विजय गायकवाड, तानाजी भोसले, अविनाश पांगे, विक्रम शिंदे आदि कर्मचार्‍यांच्या टिम तयार करण्यात आल्या असून हे कर्मचारी जातीने या आजारावर लक्ष ठेवून आहेत.

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी

चारा कमी खाणार्‍या जनावरांचा ताप मोजावा व नजीकच्या दवाखान्याशी संपर्क साधावा, बाधीत जनावरे निरोगी जनावरापासून वेगळी ठेवावीत, रोग प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना कळपात सोडू नये, डास, माशा, गोचिड या किटकांचा औषधाच्या सहाय्याने बंदोबस्त करावा,

गोठयामध्ये औषधांची फवारणी करणे, आजारी जनावरावर विषारी औषधाची फवारणी करू नये, रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना स्थानिक बाजारात नेवू नये.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लंपी आजार

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्यातील सहा विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले, पालक चिंताग्रस्त; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी आ.आवताडेंचे प्रयत्न सुरू

भयानक! आमचं प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहत सोलापुरच्या प्रेमीयुगुलाने उचलले टोकाचे पाऊल

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा