mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दातृत्व! स्वतःच्या कारखान्यावर ऋण काढून साजरा केला ‘विठ्ठल’चा सण; अभिजित पाटलांनी सभासदांना दिलेला शब्द पाळला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 8, 2022
in सोलापूर
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

ऋण काढून सण साजरा करणे ही एक ग्रामीण भागातील म्हण आहे . अर्थात ही म्हण स्वतःचे चैन भागवणान्यांसाठी वापरली जाते. मात्र या म्हणीचा अर्थ बदलून टाकणारी कृती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केली आहे.

त्यांनी स्वतःच्या दोन खासगी कारखान्यांवर कर्ज काढले असून त्या कर्जाच्या रक्कमेतून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास सुरुवात केली आहे 7 सप्टेंबरपासून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे .

श्री वठ्ठिल सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित आणि निवडणूक प्रचारात प्रचंड गाजलेल्या शेतकऱ्यांच्या सुमारे ३० कोटींच्या थकीत ऊस बिलांचा प्रश्न अखेर निकाली काढण्यात चेअरमन अभिजीत पाटील यांनी अवघ्या दीड महिन्यात यश मिळविले.

‘डीव्हीपी’ उद्योग समुहातील दोन खासगी साखर कारखान्यांवर कर्ज काढून आणि अन्य मार्गाने ही रक्कम उभी करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात केली असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सन २०२०-२१ सालच्या हंगामात कारखान्याने ३ लाख ३ हजार मे.टन उसाचे गाळप केले होते. यामधील ३ हजार ३३४ शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे सुमारे ३० कोटी रुपये थकविले होते.

यातील ८०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ची संपूर्ण प्रतिटन २१०७ रुपये इतकी रक्कम, तर उर्वरित शेतकऱ्यांचे प्रतिटन १०७ ते १ हजार रुपये या प्रमाणात ऊस बील थकीत होते.

निवडणूकी दरम्यान अभिजीत पाटील यांनी आगामी गाळप हंगाम सुरु करण्यापूर्वी मागील थकबाकीची रक्कम देण्याचा शब्द दिला होता. दि.२१ जुलै रोजी पाटील यांनी चेअरमन पदाची धुरा हाती घेतली.

त्यानंतर केवळ दीड महन्यिात थकीत ऊस बिलांचा प्रश्न मार्गी लावत दिलेल्या शब्दाची पूर्तता केली. तसेच कारखानाही सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.

‘ती’ साखर खराब

कारखान्याच्या गोदामात असलेली राज्य बँकेच्या ताब्यातील साखर विकून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा विषय सतत पुढे येत होता. उच्च न्यायालयापर्यंत हा विषय पोहोचला होता. यावरही नंतर तोडगा निघाला.

मात्र, ती साखरच अतिशय खराब झालेली असल्याने विकली जात नाही. त्यामुळे ‘धाराशिव’ आणि ‘नांदेड’ येथील साखर कारखाना युनिटवर २२ कोटी ५० लाखाचे कर्ज घेतले.

अन्य मार्गाने उर्वरित रक्कम उभा करून येथील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले देण्याचा नर्णिय घेतल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

दोन्ही मिल चालवणार

यंदाच्या हंगामासाठी कारखान्याची नवीन आणि जुनी मील सुद्धा चालवली जाणार आहे. त्यासाठी तन्हिी बॉयलर, टर्बाईनची कामे पूर्ण केली असून दररोज किमान १० हजार मे.टन ऊस होणार आहे. त्यादृष्टीने ऊस तोडणी-वाहतुकीसाठी ४५० ट्रॅक्टर, ३५० मिनी ट्रॅक्टर, २२५ बैलगाड्यांचे करार पूर्ण केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विठ्ठल सहकारी साखर कारखाना

संबंधित बातम्या

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

August 28, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

वातावरण तापले..! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर?; पुढारी सत्ताधाऱ्यांसोबत आणि समाज जरांगेसोबत; दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणाला समाज आता वैतागला

August 28, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 27, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

खबरदार! कोणत्याही नेत्याचा फोन आलातरी डॉल्बी लावू देणार नाही; पोलीस निरीक्षकांचा बैठकीत इशारा; संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हा निर्णय लागू करा; नागरिकांची मागणी

August 25, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आण म्हणत पत्नीला पैशासाठी चाबकाने मारहाण करत छळ; गळफास घेऊन महिलेने केली आत्महत्या

August 22, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

धाकधूक वाढली! उजनीतून भीमा नदीत ‘इतक्या’ हजार क्युसेक तर वीर धरणातून ४७ हजार क्युसेकचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

August 20, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

मोठी बातमी! पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणूका ‘या’ महिन्यापर्यंत पुढे ढकलल्या

August 20, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण भरले ‘एवढे’ टक्के; मुसळधार पावसामुळे उजनीतून दोन महिन्यात सोडले ६३ टीएमसी पाणी; धरणात दौंडवरून आवक सुरूच

August 19, 2025
Next Post

भैरवनाथ शुगरचे यंदा ७ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट; बॉयलर पूजन संपन्न

ताज्या बातम्या

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

August 28, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

करारा जवाब मिलेगा! भारत सरकारनं आखली मोठी योजना; डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा सामना करण्यासाठी खेळी

August 28, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

वातावरण तापले..! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर?; पुढारी सत्ताधाऱ्यांसोबत आणि समाज जरांगेसोबत; दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणाला समाज आता वैतागला

August 28, 2025
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा आज मंगळवेढा शाखेचा दुसरा वर्धापनदिन सोहळा; 100 टक्के वसुली, लेखापरीक्षकांनी दिला ‘अ’ वर्गाचा दर्जा; कमीत कमी वेळेत सोनेतारण कर्ज 80 हजार प्रति तोळा

August 28, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी, ‘या’ अटी-शर्ती पाळाव्या लागणार; नियम नेमके काय?

August 27, 2025
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळ! मंदिराच्या दानपेटीतील पाच हजार रुपये लंपास, पतसंस्थेचे शटर उचकटुन उघडण्याचा प्रयत्न; मंगळवेढा तालुक्यातील घटना

August 27, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा