टीम मंगळवेढा टाईम्स ।
महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीवरून एकमत न झाल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील बंदोबस्तातील नंदेश्वर व भाळवणी येथील ग्रामसभेतील अध्यक्ष निवडीचा विषय तहकूब करण्याची नामुस्की ग्रामपंचायतीवर आली.
नंदेश्वर येथे महात्मा गांधी तंटामुक्त निवडीच्या अनुषंगाने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या ग्रामसभेत विविध विषयावर एकमत झाल्यानंतर बंद असलेल्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी बंद असल्यामुळे पाणीपट्टी वाढ न करण्याचा ठराव सर्वांमध्ये मंजूर झाल्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त समिती निवडीवर चौघेजण इच्छुक होते.
परंतु, यावरून तंटा निर्माण होईल या पार्श्वभूमीवर पोलीसाला प्राचारण करण्यात आले .पो. नि. रणजित माने, स. पो. नि.बापूसाहेब पिंगळे आदी सह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
परंतु सरपंचांनी गावात निर्माण झालेले तंटे मिटवण्यासाठी आपण सक्षम असलेले सांगून निवडीचा विषय तहकूब केला.
पोलीस बंदोबस्तात होणाऱ्या अध्यक्ष निवडीचा विषय रद्द केल्यामुळे उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला तर काल आयोजित केलेल्या भाळवणी ग्रामपंचायतची ग्रामसभा कोरमअभावी रद्द करून व दि.5 सप्टेंबर रोजी पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या विहिरीचे अधिग्रहण,धोकादायक महावितरणच्या तारा पर्यायी मार्गाने वळवणेबाबत, मनरेगा व इतर विषयावर चर्चा झाल्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदासाठी धनाजी चव्हाण व सत्यवान जावीर ही दोन नावे अध्यक्ष पदासाठी पुढे आली.
त्यावर सत्यवान जावीर यांनी आपण माघार घेतल्यामुळे धनाजी चव्हाण यांच्या निवडीवर एकमत होत असतानाच हा विषय तहकूब करण्यात आल्याचे ग्रामसेवकांनी जाहीर केले.
वास्तविक पाहता त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी अध्यक्ष निवडीचा विषय तहकूब करत असाल तर या सभेतील सर्वच विषय रद्द करावेत अशी मागणी केली.
अध्यक्ष निवड करायची नसेल तर ग्रामसभा घेतलीच कशाला असाही प्रश्न यावेळी दीपक निकम यांनी उपस्थित केला.
डिसेंबर महिन्यात या राजकीय या निवडणुका बिनविरोध होण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात तंटामुक्ती अध्यक्ष असणे आवश्यक आहे.
परंतु गाव पातळीवरील राजकीय प्रमुखांनी निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष निवडीचा विषय तहकूब करत शासनाच्या महत्त्वकांशी योजनेला खो देण्याचा प्रयत्न केला.(स्रोत:सकाळ)
ग्रामसेवकाच्या मनमानीमुळे तंटा निर्माण करून ठेवला
तंटामुक्त अध्यक्ष निवडीवर एकमत होत असताना ग्रामसेवकांनी चुकीचा निर्णय घेऊन अध्यक्षपदासाठी वाद नसताना विनाकारण वाद निर्माण करून ठेवला कोरमाअभावी तहकूब केलेली ग्रामसभा पुन्हा सात दिवसात घेताना त्यासाठी कोरमचा नियम लागू नसताना देखील ग्रामसेवकाच्या मनमानीमुळे अध्यक्ष निवड जाहीर न करता निवडीवरून तंटा निर्माण करून ठेवला.-ज्ञानेश्वर पाटील ग्रामस्थ, भाळवणी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज