टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात स्व.आमदार भारत भालके आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावाचा पाणी प्रश्न गेल्या २५-३० वर्षांपासून रेंगाळत राहिला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ३५ गावाचे पाणी हा कळीचा मुद्दा होता. राज्यात सत्तांतर झाले आणि आमदार समाधान अवताडे यांनी घेतलेल्या २४ गावच्या पाणी प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
अधिवेशन झाल्यानंतर ७ दिवसात मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्यामुळे तालुक्याचा कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती बदलली जाणार आहे.
कायमस्वरूपी दुष्काळी ३५ गावातील ११ गावांना म्हैसाळ योजनेतुन पाणी देण्यात येत आहे. स्व.आमदार भारत भालके यांनी मतदार संघाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर त्यांनी ३५ गावच्या पाण्याचा प्रश्न हाती घेतला.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून अथक परिश्रमानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणूक निवडणुकीच्या तोंडावर योजनेला मंजुरी आणली होती. मात्र सत्तांतर झाले भाजप आणि सेनेची सत्ता आल्यानंतर ३५ गावच्या योजनेसाठी काहीच झाले नाही.
भाजपची सत्ता असताना आमदार प्रशांत परिचारक विधानपरिषदेवर आमदार झाले. भालके परिचारक दोघेही आमदार असताना पाणी प्रश्नावर तोडगा निघाला नाही.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर पुन्हा स्व.आमदार भारत भालके यांनी प्रयत्न केले. आमदार भारत भालके यांना कोरोना झाला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
स्व.आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ३५ गावची योजना मार्गी लावणे हीच भारत नाना भालके यांना श्रद्धांजली ठरेल असे उदगार काढल्यानंतर महाविकास आघाडी योजनेला मान्यता देणार असे वाटत होते.
मात्र स्व.भारत भालके यांच्या निधनाला एक वर्षांहून अधिक काळ गेल्यावरही योजनेला मान्यता मिळली नाही. सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्याच विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार समाधान अवताडे यांनी दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरू देऊ नका असे भावनिक साद घातल्यानंतर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन झाल्यानंतर २४ गावच्या योजनेला मान्यता देणार आणि योजनेला निधी उपलब्ध करून देणार असे अधिवेशनात सांगितल्यामुळे मंगळवेढ्याचा कायमस्वरूपी दुष्काळ हटणार असल्याचे चित्र आहे.
समाधान अवताडे यांनी आमदार होऊन दीड वर्षाच्या कालावधीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास संपादन केल्यामुळे २४ गावची योजना मार्गी लागणार आहे.(स्रोत:सुराज्य)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज