टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हाच सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे.
अशावेळी ही प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश महत्त्वाचा मानून मंगळवेढा येथे कृषी विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्त रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
या महोत्सवात ३७ प्रकारच्या दुर्मीळ रानभाज्या उपलब्ध करण्यात आल्या. या महोत्सवास शहरवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
या महोत्सवाचे उद्घाटन आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर , मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव ,
बीडीओ शिवाजी पाटील , प्रा.येताळा भगत , शशिकांत चव्हाण , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले, सचिन शिवशरण , प्रदीप खांडेकर , राजेंद्र सुरवसे,
भारत निकम , प्रकाश गायकवाड , कैलास कोळी , चंद्रशेखर कोंडुभैरी , चंद्रकांत पडवळे आदी अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी प्रशांत काटे , सुरेश ढाणे , आत्माचे विक्रम सावजी , शैलेंद्र पाटील , सर्व कृषी पर्यवेक्षक , सर्व कृषी सहायक यांनी परिश्रम घेतले.
कडवंची ते करडई ….
■ कडवंची, पाथरी, तांदुळजा, गुळवेल, चिघळ घोळ, पिंपळ, चुका, केना, शेवगापाने फुले, अळू, अंबाडी, उंबरफळ, करडई, माठ, काटेमाठ, राजगिरा सराटा, कुरडू, टाकळा, आघाडा, मायाळू, बांबुकोंब, पानओवा, भुईअवळा, गवतीचहा, कवठ, बीट, शतावरी अशा प्रकारच्या ३७ रानभाज्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले.
रानभाज्यांना बाजारपेठ हवी : आवताडे
या रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन करताना आ.समाधान आवताडे यांनी कृषी विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्यांचे सेवन वरदान ठरेल.
रानभाज्यातील गुणधर्म लक्षात घेऊन अशा प्रकारे तालुका पातळीवर महोत्सव, पाककृती स्पर्धेचे आयोजन करून अधिक राजभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज