टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथे तिरट नावाचा जुगार खेळल्या जात असलेल्या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून मोटर सायकली व रोख पैशासह २ लाख १० हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
क्लब चालक शत्रुघ्न उर्फ पिंटू विठ्ठल कोळी (वय ३७), श्रीमंत मसाजी भालेराव (वय ४७) , ज्ञानेश्वर औदुंबर बेदरे ( वय ३४ ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
तर ज्ञानेश्वर तुकाराम बाबर , किसन विलास शिंदे , नेताजी जालिंदर शिंदे , कल्याण नागनाथ बाबर , गुंडोपंत भानुदास बाबर , महेश विठ्ठल सुतार हे आरोपी पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, बोराळे बीट हद्दीमध्ये दि. ९ रोजी प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरिक्षक धापटे , सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे , वाघमोडे , पोलिस हवालदार महेश कोळी , पोलिस नाईक विठ्ठल विभुते , पोलिस शिपाई पोरे आदी मोहरम सणानिमित्त पेट्रोलिंग करीत असताना
पोलिस निरिक्षक रणजित माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत बठाण येथे पिंटू कोळी यांच्या हॉटेलच्या पाठीमागे काही लोक पत्त्याच्या पानावर तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती समजली.
त्यांनी तात्काळ समजलेल्या ठिकाणी कारवाई करण्याच्या सुचना दिल्याने सदर पोलिसांचे पथकाने जुगार अड्डयावर छापा टाकला.
यावेळी वरील सर्व आरोपी गोलाकार बसून जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांना तीघांना पकडण्यात यश आले तर सहा जण फरार झाले.
दरम्यान, नऊ आरोपीविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या सहा फरार आरोपींचा कसून शोध पोलिस घेत आहेत.
या छाप्यामध्ये १० हजार ७ ९ ० रुपये रोख रक्कम , ५० हजाराची एक हिरो होंडा , ५० हजाराची होंडा ड्रिम युगा कंपनीची गाडी , ५० हजार रुपये किमतीची युनिकॉर्न ,
५० हजार रुपये किंमतीची बजाज प्लॅटिना असा एकूण २ लाख १० हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान मंगळवेढा पोलिसांनी अवैध धंदयाविरूध्द मोहिम उघडली असून ही मोहिम पुढेही अशीच चालू राहणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज