टीम मंगळवेढा टाईम्स।
अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले रामचंद्र जगताप यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार दीपक साळुंखे यांनी काढले आहेत.
ते रतनचद शाह बँकेचे व्हा. चेअरमन रामचंद्र जगताप यांच्या अमृत्महत्सव निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी मा.आ.साळुंखे बोलत होते.
व्यासपीठावर धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुगे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बबनराव आवताडे, व्हा.चेअरमन तानाजी खरात, रामकृष्ण नागणे, राष्ट्रवादीचे नेते लतिफ तांबोळी, इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष अँड.सुजित कदम, राजेंद्र हजारे, अजित जगताप, सुप्रिया जगताप,विजयकुमार खवतोडे आदीजन उपस्थित होते.
दीपक साळुंखे पुढे बोलताना म्हणाले की, जगताप कुटूंबीय मूळचे सांगोला तालु्यातील मांजरी येथील असल्यामुळे आम्हला त्यांचा अभिमान आहे त्यांनी मंगळवेढा तालुक्यात राजकारण बरोबरच समाजकारण चांगल्या प्रकारे केले.
अमृत्महसत्वा निमित्त रामचंद्र जगताप यांची स्पर्धा परीक्षा अभ्यास क्रमाची पुस्तके व ज्येष्ठ नागरिकांसाठी आत्मचरित्रे कादंबऱ्या गोष्टी विद महापूर्श्याच्या पुस्तकांचे ग्रंथ तुला करण्यात आली.
तसेच भारत देशाच्या अमृत्महस्तावनिमित तिरंगी झेंड्याची वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते लतिफ तांबोळी यांनी शुभेच्छा दिल्या तसेच विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व रामचंद्र जगताप यांचा समाजकारण,राजकारण यातील कार्य आमच्या सारख्या तरुणांना आदर्श व्रत असून भविष्यात आम्हाला ही त्यांच्या कार्यातून काम करण्याची प्रेरणा मिळेल असे मनोगत व्यक्त केले.
धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळूगे यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले रामचंद्र जगताप व मी आठवी पासून वर्ग मित्र असून कॉलेजच्या जीवनापर्यंत एकाच वर्गात शिकलो,
आज आम्हा दोघानाही अमृत महोत्सव करण्याचा योग आला हे आमचे नशीब आहे. यावेळी त्यांनी कॉलेज जीवनातील अनेक गमतीदार किस्से व आठवणी सांगितल्या भविष्यात सहस्त्राचांद्रा दर्शन साजरा कऱ्यनचा योग मिळावा ही परमेश्वराचे चरणी प्रार्थना केली.
यावेळी राम साळे, बाबुराव गायकवाड,सुभाष भोसले, वामनराव माने, विलास साळुंखे, तानाजी पाटील, दामोधर देशमुख,
अशोक सुरवसे, युवराज कलुबरमे, प्रकाश गायकवाड,चेतन केदार, निलराज डोंबे, लक्ष्मण जगताप, विजय खवतोडे, चंद्रकांत घुले,युन्नश शेख,औदुबर वाडदेकर,भारत बेदरे,आपा चोपडे, मुरलीधर दत्तू, गोपाळ भगरे,गौरीशंकर बुरकुल,राजू पाटील, बसवराज पाटील,तानाजी काकडे, दिगंबर भाकरे , तानाजी कांबळे ,अरुण किल्लेदार, चंद्रशेखर कौडूभैरी,रामेश्वर मासाळ शंकर माळी यांच्यासह अनेक नेतेमंडळी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत अजित जगताप यांनी तर सूत्रसंचालन विनायक कलुबर्मे व भारत मुढे यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज