टीम मंगळवेढा टाईम्स ।
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या सुमारे 40 दिवसांनंत सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी राजभवनावर हा विस्तार होण्याची शक्यता आहे.
यात 20 ते 25 मंत्री शपथ घेतील असे सांगण्यात येते आहे. यात भाजपच्या मंत्र्यांची संख्या जास्त असेल असेही सांगण्यात येते आहे.
गेल्या महिनाभरापासून याबाबतच्या चर्चा सुरु होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील नावे निश्चित करण्यासाठी दिल्लीत चार ते पाच दौरे केले आहेत.
यात भाजपा पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिमंडळातील नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती आहे. भाजपात मंत्रीपदावर नवे चेहरे दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
तसेच अर्थ, गृह, महसूल यासारखी खातीही कुणाला मिळतील, याबाबत साशंकता वर्तवण्यात येते आहे. अनेक अनेपेक्षित बदल या नव्या मंत्रिमंडळात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
आज संध्याकाळी या आमदारांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन केले जाण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे गटातील यांना संधी मिळण्याची शक्यता
आज संध्याकाळी या आमदारांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन केले जाण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे गटात बंडाच्या काळात ज्यांना महत्त्वाची भूमिका बजावली, त्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
तसेच मविआ सरकारच्या काळात जे मंत्रिपदावर होते, त्यांनाही नव्या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
त्यात दीपक केसरकर, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, भरत गोगावले तसेच अपक्षांतून बच्चू कडू, राजेंद्र पाटील येड्रावकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
भाजपातून कुणाला संधी मिळण्याची शक्यता
भाजपामध्ये मंत्रिमंडळ विस्तारात अनेक जणांची नावे चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी अनेक दिग्गज नेते भाजपात आले होते. त्यांचाही समावेश या नव्या मंत्रिमंडळात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. यात चंद्रकातं पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्म विखे पाटील, बबनराव लोणीकर, गणेश नाईक, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, नितेश राणे, समाधान आवताडे यांच्या नावांची चर्चा आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराला का झाला विलंब
16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आणि शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करु नये, असा एक मतप्रवाह होता.
मात्र अधिवेशन तोंडावर असताना आणि राज्यातील पूरस्थितीसारखे प्रश्न गंभीर झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. विरोधकही सातत्याने या मुद्द्यावर शिंदे सरकारला टार्गेट करीत होते.
आता 10 ऑगस्टपासून अधिवेशन सुरु होत आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणी 12 ऑगस्टला पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यापूर्वी जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्या सकाळी शपथविधी पार पडणार असल्याचे सांगण्यात येते आहे.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज