टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील सत्तांतरानंतर आता विरोधातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप आणि शिंदे गटातील प्रवेशाकडे कल वाढल्याचं पाहायला मिळतंय.
पंढरपूरमध्येही राजकीय हालचालींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
महत्वाची बाब म्हणजे या नेत्यासाठी ‘काय डोंगर, काय झाली, काय हॉटेल’ या एका डायलॉगने फेमस झालेले शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती मिळतेय.
तर दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील सत्ताधाऱ्यांमधील एक गट शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
कल्याणराव काळे एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते कल्याणराव काळे एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे.
साधना भोसले, नागेश भोसलेही शिंदे गटात प्रवेश करण्याची जोरदार चर्चा
तर आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांचे पती नागेश भोसलेही शिंदे गटात प्रवेश करण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शहाजीबापू पाटील यांच्या मध्यस्थीनं हे प्रवेश होणार असल्याचं कळतंय.
आषाढी एकादशीच्या महापूजेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात आले तेव्हा त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर पंढरपुरात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
कल्याण काळे कोण आहेत?
कल्याणराव काळे हे 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले
माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार, राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम
भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष, सीताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषवले होते, राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष होते. (स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज