टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी परिसरातून एक शेळी, एक बोकड व पाण्याची मोटर असा एकूण २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी अनिकेत लुगडे रात्री १०.०० वा.सर्वजण जेवण करून झोपले असताना
रात्री २.०० च्या दरम्यान लहान बोकड ओरडू लागल्याने फिर्यादी उठून घराबाहेर आले असता त्यांना पाहून इतर शेळया ओरडू लागल्याने
फिर्यादीने जवळ जावून पाहिले असता बांधलेल्या ठिकाणी १२ हजार रुपये किमतीची दोन वर्षे वयाची काळया रंगाची उजव्या पायाच्या बाजूस पांढरा पट्टा असलेली शेळी
तसेच ७ हजार रुपये किमतीचे ९ महिन्याचे काळया रंगाचे बोकड व ३ हजार रुपये किमतीची पाण्याची मोटर असा एकूण २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात सध्या शेळया चोरण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून आत्तापर्यंत चोरीला गेलेल्या शेळ्या पकडण्यात पोलिसांना अदयापही यश न आल्याने शेळ्या चोरण्याच्या प्रमाणात भर पडत आहे.
ब्रम्हपुरी , माचणूर येथून या पुर्वीही शेळया चोरीला गेल्या आहेत. रात्रीच्यावेळी चोरटे मोटर सायकलवर शेळया घेवून जावून बाजारात त्याची विक्री करून आपले हात पांढरे करीत आहेत.
परिणामी या घटनेमुळे शेळी पालन करणाऱ्या व्यवसायिकामधून घबराट पसरली असून पोलिसांनी तात्काळ त्यांचा शोध घेवून शेतकऱ्यांना न्याय दयावा अशी मागणी होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज