mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मेरी शान तिरंगा! हर घर झेंडा उपक्रमांतर्गत मंगळवेढा शहरासह तालुक्यात ‘एवढ्या’ हजार प्रत्येक घर, कार्यालय, दुकानावर तिरंगा फडकणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 22, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
मेरी शान तिरंगा! हर घर झेंडा उपक्रमांतर्गत मंगळवेढा शहरासह तालुक्यात ‘एवढ्या’ हजार प्रत्येक घर, कार्यालय, दुकानावर तिरंगा फडकणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यात हर घर झेंडा या उपक्रमांतर्गत मंगळवेढा शहरासह तालुक्यात 40 हजार घरे व इमारतीवर तिरंगा झेंडा फडकावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत आहे. यानिमित्ताने नागरीकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्या.

या लढयातील क्रांतीकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी.

या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर झेंडा हा उपक्रम ध्वजसंहितेचे पालन करुन जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली

मंगळवेढा तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे या उपक्रमांतर्गत मंगळवेढा शहरासह तालुक्यात 40 हजार घरे व इमारतीवर तिरंगा झेंडा फडकावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली आहे.

२१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्याबाबत आयोजित आढावा पार पडली.

जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे

१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात प्रत्येक घरावर, कार्यालयावर, दुकानावर भारतीय राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहे.

नागरीकांना राष्ट्रध्वज सहज खरेदी करता येईल यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात ध्वज विक्री केंद्र निश्चित करण्यात येणार आहेत.

हर घर झेंडा हा उपक्रम राबवितांना भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही या दक्षतेसाठी पुढील महिन्यात या उपक्रमाची विविध माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती करण्यात येणार आहे.

कोणत्या आकाराचे राष्ट्रध्वज घरी, कार्यालय आणि दुकाने यामध्ये लावण्यात यावे याबाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणे जरुरीचे आहे अशी माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली भारतीय ध्वजसंहिता २००६ याबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन केले जाईल.

सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी व्यापक प्रमाणात जाणीव जागृती मोहिम या उपक्रमासाठी प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्व सामान्य नागरीकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करुन हर घर झेंडा हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली.

तालुक्यातील आवश्यक घरांची संख्या लक्षात घेऊन स्थानिक विक्रेते व पुरवठादार यांच्याशी संपर्क करून तिरंगा झेंडा खरेदीबाबत नियोजन करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे तालुक्यातील महिला बचतगटांना सुद्धा याबाबत प्रशिक्षण देवून तिरंगा झेंडा निर्मिती करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत अशी माहिती तहसीलदार रावडे यांनी दिली.

शासनाच्या हर घर झेंडा हा उपक्रमांतर्गत नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकावण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. झेंड्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे.

शहरात ठिकठिकाणी स्टॉल उभारून नागरिकांना सशुल्क झेंडा उपलब्ध करून देणार आहे असल्याचे स्वप्नील रावडे यांनी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: हर घर झेंडा

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
Next Post
भीतीदायक! मंगळवेढ्यात जीप आडवून दाेघांना लुटले, ६२ हजारांचा मुद्देमाल जबरीने नेला काढून; ‘या’ मार्गावरील घटना

कामगिरी! मंगळवेढा पोलिसांनी पकडला 66 हजारांचा गुटखा, दोघांना अटक; प्रत्येक टपरीत गुटखा येतोय कोठून?

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..