टीम मंगळवेढा टाईम्स ।
कॉलेजच्या एका अल्पवयीन मुलीचा कर्नाटकातील चडचण येथे होणारा बालविवाह मंगळवेढा पोलिसांनी रोखून सदर मुलीच्या आई वडीलांचे व मुलीचे समुपदेशन करून त्या अल्पवयीन मुलीला सोलापूर येथील बालसुधारगृहात दाखल करण्यात आल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मंगळवेढा पोलिसांनी एका आठवडयात दोन बालविवाह रोखण्याची विशेष कामगिरी केली आहे.
या घटनेची हकिकत अशी, डोणज येथील एका 16 वर्षे 16 दिवस पुर्ण झालेल्या मुलीचा कर्नाटकातील निंबर्गी येथील एका 24 वर्षीय मुलाशी दि.21 जुलै रोजी कर्नाटकात बालविवाह करण्याची तयारी सुुरू होती.
मात्र त्या अल्पवयीन कॉलेज तरूणीस हा बालविवाह मान्य नसल्याने तीने थेट सोलापूर येथील पोलिस नियंत्रण कक्षाच्या 100 नंबरवर संपर्क साधून या अल्पवयीन विवाहाबाबतची माहिती दिली.
मंगळवेढयाच्या डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी तात्काळ बोराळे बीटचे पोलिस हवालदार महेश कोळी यांना पाचारण करून
सदर मुलीस व मुलीच्या आईवडील व मामा यांना मंगळवेढा पोलिस ठाण्यात हजर करून पोलिस निरिक्षक माने यांनी मुलीच्या आई वडीलांना कायदयाबाबत जनजागृती करून त्यांचे मन परिवर्तन केले.
व 18 वर्षे पुर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असा लेखी जबाब लिहून घेतला.
सदर अल्पवयीन मुलीस सोलापूर येथील बालसुधारगृहात पोलिस कॉन्स्टेबल रंजना आटपाडकर यांनी त्या अल्पवयीन मुलीस दाखल केले.
मागील आठवडयात मंगळवेढा शहरानजीक असलेल्या एका मंगल कार्यालयात
दरम्यान, मागील आठवडयात मंगळवेढा शहरानजीक असलेल्या एका मंगल कार्यालयात 7 विवाहापैकी एक बालविवाह होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तेथे जावून तो बालविवाह रोखला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज