टीम मंगळवेढा टाईम्स ।
वाढत्या महागाई हैराम झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना शिंदे सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी इंधनाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा शिंदे यांनी बैठकीनंतर केली.
शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
त्यानुसार पेट्रोलच्या दरात पाच रुपये तर डिझेलच्या दरात तीन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. शिंदे सरकारकडून महाराष्ट्राला हे पहिलं गिफ्ट देण्यात आलं आहे. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिंदे म्हणाले, पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 4 नोव्हेंबर व 22 मे रोजी करात कपात केली होती. त्यांनी राज्य सरकारलाही कर कमी करण्याचे आवाहन केलं होतं.
परंतु काही राज्यांनी सुचना मान्य करून कर कमी केला होता. महाराष्ट्र शासनाने कर कमी केला नव्हता.
आता युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही आज पेट्रोलवर प्रतिलिटर पाच रुपये व डिझेलवर तीन रुपये दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सहा हजार कोटी रुपयांचा भार शासनावर भार पडणार आहे.
जनतेला यातून दिलासा मिळेल. डिझेलच्या दरवाढीमुळे वाढलेली महागाईतूनही दिलासा मिळणार आहे. पेट्रोलमध्ये दर कमी केल्याने नागरिकांनाही दिलासा मिळेल, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. अनेक नद्यांना महापूर आल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. पण अशास्थितीत राज्यात मंत्रिमंडळच अस्तित्वात नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्याचा गाडा हाकत आहेत. आजची मंत्रिमंडळाची बैठकही दोघांनीच घेतली. त्यामुळे आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज