mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिर्के मॅटर्निटी होम! रुग्णसेवेचा वारसा जपणारे मंगळवेढ्याचे शिर्के दाम्पत्य

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 1, 2022
in आरोग्य, मंगळवेढा
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढ्यातील शिर्के मॅटर्निटी होम म्हणजेच गोरगरिबांचे शिर्के हॉस्पिटल हे रुग्णसेवेचा वारसा जपणारे हॉस्पिटल म्हणून डॉ.शरद शिर्के व डॉ. प्रीती शिर्के यांच्याकडे पाहिले जाते.

घरातून चालत आलेले उत्तम संस्कार माणसाला घडवतात.हे संस्कार घडवणारे आई-वडील,शिक्षक, अथवा एखादी महत्त्वपूर्ण व्यक्ती असते.

डॉ.शरद शिर्के यांच्या आयुष्याला वळण देऊन योग्य कलाटणी देणारे त्यांचे आई-वडील आहेत.घरातून झालेले उत्तम संस्कार आणि लहानपणापासून मिळालेले आदर्शाचे व प्रामाणिकपणाचे धडे घेऊन डॉ.शरद शिर्के हे आयुष्याच्या कठीण मार्गावर यशस्वी चालताना तालुका पाहत आहे.

घरातील उत्तम संस्कारामुळे डॉ. शिर्के यांचे व्यक्तिमत्त्व उत्तम अशा रीतीने घडले. सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांचा आदर करत मंगळवेढा शहरात वैद्यकीयपेशा सोबत क्रीडा, सामाजिक,सांस्कृतिक,नाट्य-चित्रपट विविध वैद्यकीय शिबिरे तसेच वेगवेगळ्या व्यवसायात आज त्यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते आहे.

मनात आसक्ती आणि तीव्र इच्छाशक्ती असली की अडचणी आड येत नाहीत.आयुष्यातील अनंत अडचणींवर मात करून यशाची अनेक शिखरे गाठणारी माणसे आपल्या अवतीभवती असतात.

बघणार्‍याला त्यांचे यश दिसत असलं तरी त्यामागे उपसलेले कष्ट आणि केलेली प्रयत्नांची पराकाष्टा कुणालाच दिसत नाही.म्हणूनच अशी माणसे समाजाच्या कौतुकास आणि आदरास पात्र ठरतात. याच यादीत डॉ शरद वसंत शिर्के हे नाव पहिल्या क्रमांकाने घ्यावं लागेल.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे डॉ शरद शिर्के यांचे गाव.त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर खऱ्या अर्थाने भवितव्य कोठे घडवायचं असा विचार करत असताना त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील सलगर सारख्या खेडेगावात वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरीस सुरुवात केली.

सोलापूर येथील प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर वैशपायन वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी प्रथम एमबीबीएस हा डॉक्टरकीचा कालावधी पूर्ण केला.त्यानंतर 1994 साली ते सलगर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करू लागले.

लहान वयापासूनच त्यांना वैद्यकीय क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी त्याच क्षेत्रात आपलं नाव उज्वल केलं. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिक कष्ट करून मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.

वैद्यकीय क्षेत्रात चांगलं काम करत असतानाच त्यांनी 2004 सारी रिलायन्स पेट्रोल पंप सुरू करून एक मोठं धाडसी पाऊल मंगळवेढ्यात पहिल्यांदा टाकले.

त्या पंपाची एक चांगला ब्रँड म्हणून संपूर्ण तालुक्यात ओळख आहे.या पंपाच्या व्यवसायात स्थिरस्थावर होत असतानाच त्यांनी 2005 साली मुंबई येथील कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन येथून स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ ही पदवी प्रदान केली.

त्यानंतर बऱ्याच दिवस काम केल्यानंतर तसेच विविध भागातील कामाचा अनुभव आल्यानंतर त्यांनी 2014 साली अत्यंत कष्टाने निर्माण केलेल्या तालुक्यातील अद्यावत असं पाहिलं ‘शिर्के मॅटर्निटी होम’ या नावानं मंगळवेढा तालुक्यात हॉस्पिटल सुरू केलं.

हॉस्पिटलची निर्मिती हीच डॉक्टर शिर्के यांच्या अथक प्रयत्नला मिळालेले सर्वात मोठे यश होतं. डॉक्टर शरद शिर्के यांचे वडील श्री वसंतराव गोविंद शिर्के हे भारतीय सैन्यदलात नोकरीला होते.त्यांनी संपूर्ण आयुष्य हे देशाची सेवा करताना जीवाची पर्वा न करता आपलं सर्वस्व देशाच्या सीमेवर लढत घालवले.

आपल्या मुलाने चांगला डॉक्टर व्हावा ही त्यांची पहिल्या पासूनची इच्छा होती.त्यांच्या इच्छेला सत्यात उतरवण्याचे काम डॉक्टर शिर्के यांनी उत्तमरीत्या केले.

डॉक्टर शरद शिर्के यांचे शिक्षण हे मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल या प्रशालेत झाले. त्यावेळी प्रा.बी टी पाटील,डॉ.सुभाष कदम, प्रा.महादेव दिवटे,प्रा.भालके सर,प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांच्यासह प्रशालेतील त्यावेळच्या शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केल्याने मी आयुष्यात यशस्वी झालो असून माझ्या यशस्वी होण्यात इंग्लिश स्कूलचा मोलाचा वाटा आहे असे डॉ.शिर्के आवर्जून सांगतात.

माझे वडील,मी व माझा मुलगा चि.ओम हे याच प्रशालेतून घडत गेलो आहे त्यामुळे मी या प्रशालेचा कायमस्वरूपी ॠणी असल्याचे ते सांगतात.खरेतर गरीब घरातून शिक्षण चालू असताना मला एमबीबीएसला प्रवेश मिळणे हे आमच्या संपूर्ण शिर्के परिवाराला आनंदाची व अभिमानाची गोष्ट होती.

त्यावेळी मला प्रवेश मिळाल्यामुळे माझ्या आई-वडिल व काकांनी संपूर्ण गल्लीत पेढे वाटून आनंद साजरा केला होता.अशी आठवण ते सांगायला विसरत नाहीत.

खरे तर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला त्यावेळी घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि त्यातच वडील सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्याने तसेच एक भाऊ व दोन बहिणींची लग्ने यामुळे वडिलांवर मोठा आर्थिक बोजा पडत होता.त्यातूनही त्यांनी मला मदत करत माझ्या वैद्यकीय कालावधीचा खर्च उचलून मला डॉक्टर करणेकामी अथक परिश्रम करून स्वतःचे व माझे स्वप्न पूर्ण करून घेतले.

माझे आजोबा गोविंदराव शिर्के यांना दारू पिण्याची वाईट सवय असल्याने माझ्या वडिलांचे दहावीपर्यंत शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे झाले.ते कै.किसनलाल मर्दा यांच्या सान्निध्यात राहत असल्याने त्यांना देशसेवेची वेड होते. त्यामुळे ते स्वातंत्र्य संग्रामात सामील झाले.

त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच देशसेवेचे धडे मिळत गेले. त्याच ध्येयाने त्यांनी भारतीय सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे एक नया पैसा ही नव्हता मग त्यानी मंगळवेढा येथून पुणे येथे चालत जाऊन परीक्षा देऊन सैन्यात रुजु झाले.

ते सैन्यदलात असताना त्यांनी चीन,बांगलादेश व पाकिस्तान या देशाविरोधात युद्धात भाग घेतला.त्यावेळी त्यांना हाताला व पायाला गोळ्या लागल्या असल्याने त्यांच्या हातात व पायात रॉड घालण्यात आले.त्यामुळे ते कायमचे अधू झाले या सर्व घडामोडी घडत असताना आम्ही खूप आर्थिक संकटाचा सामना केला.

मी माझे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण ते साखरवाडी जिल्हा सातारा येथे घेतले नंतर मंगळवेढा येथे पुढील शिक्षण झाले.त्यानंतर मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला.नंतर कॉलेज ते हॉस्टेल असा सायकलवरून प्रवास करत शिक्षण पूर्ण करीत राहिलो आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःला दवाखाना सुरू करण्यासाठी परिस्थिती नसल्याने मी प्राथमिक आरोग्य केंद्र सलगर येथे कामासाठी रुजू झालो.

त्यावेळी स्वतःकडे गाडी नसल्याने व सलगरला एस.टी.नसल्यामुळे मी टेम्पोने प्रवास करत असे.नोकरीच्या पहिल्या दिवशी मला सलगरला सकाळी आठ वाजता पोहोचायचं होतं परंतु वाहनांची सोय नसल्याने मी जनावरांनी भरलेल्या टेम्पोत गेलो ही आठवण मी आयुष्यभर विसरणार नाही असे डॉक्टर आवर्जून सांगतात.त्यावेळी पगारही पाच सहा महिने होत नसे पण मला मोटर सायकल घ्यायची गरज होती.

परंतु पुरेसा पगार नसल्याने अडचणी होत्या.तरीसुद्धा श्री दामोदर देशमुख यांनी बळीराजा पतसंस्थेकडून मला गाडी मिळवून दिली.मग तेथून आयुष्याचा चांगला प्रवास सुरू झाला.यावरून या पिता-पुत्रांचे भावनिक नातं किती घट्ट असावे याची कल्पना आल्यावाचून राहत नाही.

आपल्या वडिलांनी अत्यंत कठोर परिश्रमातून हे यश उभारले याची त्यांना जाणीव आहे.आपणही उंच इमारत उभी केली ती केवळ पैसा आहे म्हणून नव्हे तर वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी.त्यांच्या पावलावर पाऊल टाकून देशसेवेचे व जनसेवेचे व्रत चालवण्यासाठी असल्याचे ते सांगतात.

या पितृॠणाच्या वाटेवर आपल्यासोबत सर्वांनीच सहप्रवासी व्हावं हीच डॉक्टर शरद शिर्के साहेब तुम्हाला डाॅक्टर दिनाच्या शुभेच्छा..!

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिर्के हॉस्पिटल

संबंधित बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
Next Post
स्वाभिमानी छावाच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवेढ्यात आज मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर

दूरदृष्टी! डोळ्यांच्या सर्व सुविधा व उपचारांसाठी 'वरद नेत्रालय' मंगळवेढ्यातील विश्वसनीय हॉस्पिटल

ताज्या बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा