mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दामाजीचा रणसंग्राम! आवताडे गटाची एक जागा बिनविरोध, 281 जणांनी माघार घेतली; यांच्यात होणार थेट लढत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 27, 2022
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज दाखल 328 उमेदवारांपैकी 281 जणांनी माघार घेतली,

सध्या आखाड्यात 20 जागेसाठी 47 उमेदवार अर्ज आखाड्यात शिल्लक आहेत सत्ताधारी गटाचे आ. समाधान आवताडे यांना आज एक जागा बिनविरोध करण्यात यश आले

तर पोटनिवडणुकीत एकमेकाच्या विरोधात लढलेले भालके व परिचारक समर्थकांनी दामाजीसाठी एकत्र येवून समविचारी गटातून सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे केले.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रांत करायला गर्दी चे स्वरूप प्राप्त झाले विद्यमान आ.समाधान आवताडे यांच्या गटाला आव्हान देण्यासाठी अनेक मातब्बरांनी गेल्या काही महिन्यापासून तयारी केली होती.

मात्र त्यांचे अर्ज छाणणीत बाद झाल्यामुळे सत्ताधारी गटाला कोण आव्हान देणार ? याची उत्सुकता सभासदांना लागून राहिले होते.

दरम्यान पोटनिवडणुकीत अवताडे यांच्या विजयासाठी परिचारक समर्थकाने प्रयत्न केले होते. दोघे परस्परविरोधी लागल्यास विरोधी गटाला फायदा होऊ शकेल

दोघांनी एकत्र यावे अशी भूमिका यापूर्वी मांडण्यात आली होती मात्र त्याप्रमाणे याही निवडणुकीत दोघे एकत्र येतील अशी अटकळ बांधली जात असतानाच आज परिचारक समर्थक दहा जागेवर,

तर भालके गट नऊ जागा लढवित समविचारी गट करून आव्हान दिले. सहकारी संस्था गटातून सिद्धेश्वर अवताडे यांच्या विरोधात सत्ताधारी गटातून जगन्नाथ रेवे यांनी आव्हान दिले

इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये 28 उमेदवारी अर्ज पैकी 27 जणांनी माघार घेतल्यामुळे विद्यमान संचालक अशोक केदार हे या प्रवर्गातून बिनविरोध निवडले गेले.

मंगळवेढा ऊस उत्पादक गटात उमेदवारी अर्ज दाखल केले बबनराव आवताडे यांनी आपला अर्ज माघार घेत मागे घेतला.

जागावाटपावर तोडगा विषयी काढण्यासाठी दोन दिवस स्थानिक नेत्यांनी जिवाचे रान केले त्यामुळे उमेदवार निवडताना काहींना थांबावे लागले

तर काहींना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचे या निमित्ताने बोलताना व्यक्त केला व त्यावर आपली भूमिका लवकरच जाहीर करू असा निर्णय घेतला त्यामुळे दामाजीचा आखाडा आता चुरशीचा होणार हे स्पष्ट झाले.

उमेदवारी निश्चित करताना दोन्ही गटाकडून जातीय समीकरणाबरोबर त्या गटात असलेल्या एकूण सभासदांचा देखील यामध्ये विचार केला गेला. आ.समाधान आवताडे यांनी विद्यमान संचालकातील 10 जणांना पुन्हा संधी दिली तर 11 नवीन चेहरे दिले.

मंगळवेढा उत्पादक मतदार संघ-

आ. समाधान आवताडे,राजेंद्र सुरवसे, नीलाताई अटकळे गोपाळ भगरे, गौरीशंकर बुरकुल,मुरलीधर दत्तू

ब्रम्हपुरी उत्पादक मतदार संघ-

राजेंद्र सर्जेराव पाटील, अशोक भिंगे, सचिन चौगुले,राजेद्र चरणूकाका पाटील,दयानंद सोनगे,भारत बेदरे

मरवडे उत्पादक मतदार संघ –

प्रदीप खांडेकर,गणेश पाटील, बसवेश्वर पाटील,शिवानंद पाटील,औदुंबर वाडदेकर,रेवणसिद्ध लिगाडे,

भोसे उत्पादक मतदार संघ –

अंबादास कुलकर्णी,आबा बंडगर ,उमाशंकर कनशेट्टी,गौडाप्पा बिराजदार,बसवराज पाटील,भिवा दौलतडे,

आंधळगाव उत्पादक मतदार संघ-

सुरेश भाकरे, विनायक यादव, बाळासो शिंदे,महादेव लुगडे,दिगंबर भाकरे,प्रकाश पाटील,

अनुसुचित जाती/जमाती मतदार संघ-

यूवराज शिंदे,तानाजी कांबळे

भटक्या विमुक्त जाती/जमाती मतदार संघ-

विजय माने,तानाजी खरात

महिला राखीव मतदार संघ-

स्मिता म्हमाणे,कविता निकम,लता कोळेकर,निर्मला काकडे,

सोसायटी मतदार संघ–

सिद्धेश्वर आवताडे व जगन्नाथ रेवे या प्रमुख लढती लक्षवेधक ठरणार आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संत दामाजी साखर कारखाना

संबंधित बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 30, 2026
Next Post
मंगळवेढ्यात भाजपात उभी फूट, आ.प्रशांत परिचारकांची कट्टर विरोधक असलेल्या भालकेंशी युती; आ.आवताडेंना भाजप तालुकाध्यक्षाचे आवाहन

मंगळवेढ्यात भाजपात उभी फूट, आ.प्रशांत परिचारकांची कट्टर विरोधक असलेल्या भालकेंशी युती; आ.आवताडेंना भाजप तालुकाध्यक्षाचे आवाहन

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा